Beed: भरधाव स्कॉर्पिओने 2 सख्ख्या बहिणींना चिरडले; दोन गंभीर जखमी

जामखेड - पाटोदा रस्त्यावर धनगर जवळका गावात हा थरार घडला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Beed: भरधाव स्कॉर्पिओने 2 सख्ख्या बहिणींना चिरडले; दोन गंभीर जखमी
Beed: भरधाव स्कॉर्पिओने 2 सख्ख्या बहिणींना चिरडले; दोन गंभीर जखमीSaam TV

बीड : जेवण करून घराबाहेर उभे असलेल्या दोन सख्या बहिणींना भरधाव स्कॉर्पिओने चिरडले आहे. यात दोघींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना, बीडच्या (Beed) पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथे रात्री 8 च्या सुमारास घडली आहे. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जामखेड - पाटोदा रस्त्यावर धनगर जवळका गावात हा थरार घडला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

रोहिणी महारुद्र गाडेकर आणि मोहिनी महारुद्र गाडेकर असं मृत बहिणींचे नावं आहेत. मयत मोहिनी ही डी फार्मसी चे शिक्षण घेत होती. तर स्कॉर्पिओने आणखीन दोघांना चिरडले असून ते गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर स्कॉर्पिओ चालक फरार झाला आहे. या प्रकरणी पाटोदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून गाडेकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com