सांगलीत शनिवारपर्यंत जमावबंदी; संभाजी भिडेंची सभा रद्द

आजची सभा स्थगित करीत आहाेत अशी माहिती शिवप्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
सांगलीत शनिवारपर्यंत जमावबंदी; संभाजी भिडेंची सभा रद्द
sambhaji bhide

सांगली : त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने रझा अकादमीने १२ नोव्हेंबरला पुकारलेल्या बंद दरम्यान घडलेल्या घटनेचे पडसाद उमटून महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद व कारंजा या ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्या अनुषंगाने समाज कंटकांच्या माध्यमातून दोन समाजात, गटांत तेढ निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सांगली जिल्ह्यात २० नाेव्हेंबरपर्यंत जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. sambhaji bhide shivprathisthan sangli section 144

sambhaji bhide
'राजमातांनी बाबासाहेबांना शिवशाहीर पदवी बहाल केली हाेती'

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. या आदेशात पाच व पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येणे, सभा घेणे, तसेच शस्त्र, लाठी, काठी बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

सांगलीत जमावबंदी आदेश लागू केल्याने शिवप्रतिष्ठानाने आज (मंगळवार) शहरात आयोजित केलेली निषेध सभा स्थगित केल्याची माहिती दिली. ही सभा संभाजी भिडे (गुरुजी) यांच्या नेतृत्वाखाली हाेणार हाेती. जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याने सभा स्थगित करीत आहाेत अशी माहिती शिवप्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

रझा अकादमीवर बंदी घाला : साता-यात प्रशासनास निवेदन

दरम्यान अमरावती येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ व रझा अकादमीवर संपूर्ण बंदी घालण्यात यावी अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सातारा विभागाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनास निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. हे निवेदन अमर बेंद्रे, धनंजय खोले, शुभम शिंदे, अजिंक्य गुजर, हेमंत खटावकर यांच्या शिवप्रतिष्ठानच्या सदस्यांनी उपजिल्हाधिकारी सुनील थाेरवे यांना दिले.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.