दमरेच्या महाव्यवस्थापकांकडून अकोला ते पूर्णा दरम्यान सुरक्षेची पाहणी
रेल्वे स्थानकाची पाहणी करताना महाव्यवस्थापक गजानन माल्या

दमरेच्या महाव्यवस्थापकांकडून अकोला ते पूर्णा दरम्यान सुरक्षेची पाहणी

श्री माल्या यांचा हा दौरा मुख्यत्वे अकोला- पूर्णा स्थानकांदरम्यान येणाऱ्या रेल्वे स्थानकावर, रेल्वे फाटकांवर, रेल्वे पटरीवर, रेल्वे पुलांवर तसेच या दरम्यान येणाऱ्या रेल्वे सिग्नल, इत्यादीचा सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी दौरा होता.

नांदेड - रेल्वे विभागातील अकोला ते पूर्णा दरम्यान सुरक्षा ( सेफ्टी ) निरीक्षण पूर्ण केले. त्यांच्या समवेत नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक उपिंदरसिंघ, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक आर. धनंजयलु, प्रधान मुख्य अभियंता संजीव अगरवाल, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी एम. रवींद्रनाथ रेड्डी आदी उपस्थित होते.

श्री माल्या यांचा हा दौरा मुख्यत्वे अकोला- पूर्णा स्थानकांदरम्यान येणाऱ्या रेल्वे स्थानकावर, रेल्वे फाटकांवर, रेल्वे पटरीवर, रेल्वे पुलांवर तसेच या दरम्यान येणाऱ्या रेल्वे सिग्नल, इत्यादीचा सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी दौरा होता. सर्व प्रथम महाव्यवस्थापकांनी अकोला रेल्वे स्थानकाची पाहणी केली, यात त्यांनी स्टेशन मास्तर यांचे कार्यालय, स्थानकातील प्रवासी सुविधा, रेल्वेचा दवाखाना ची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी इतर अधिकाऱ्यांसोबत रेल्वे दवाखान्यात वृक्षारोपण केले.

हेही वाचा - बाबुराव कदम यांनी बंडखोरी केली तरी ते जनाधार असणारे शिवसैनिक होते. हे निकालाने सिद्ध केले होते. याच कारणामुळे कोहळीकर यांनी पक्षातील वरिष्ठांशी स्नेहसंबंध कायम ठेवले असावेत

त्यानंतर त्यांनी शिवानी शिवापूर रेल्वे स्थानकावर पाहणी केली, तेथील सुविधा, माल धक्का ची पाहणी केली. उपस्थित अधिकाऱ्यांसोबत स्थानक तसेच माल धक्का इत्यादी च्या विकास कार्यक्रमाची चर्चा केली. त्यानंतर वाशीम रेल्वे स्थानकावर पाहणी केली, रेल्वे स्थानका समोरील परिसर, प्रवासी सुविधा आदी ची पाहणी केली. स्थानकातील विकास कामांचा आढावा घेतला. तसेच नवीन चलपथ निरीक्षक कार्यालयाचे उद्घाटन केले.

नंतर श्री माल्या यांनी हिंगोली रेल्वे स्थानकावरील प्रवासी सुविधांचे निरीक्षण केले. तसेच हिंगीली माल धक्याची पाहणी केली. रेल्वे स्थानक परिसराची हि पाहणी केली. उपस्थित अधिकाऱ्यांसोबत हिंगोली रेल्वे स्थानकाच्या विकास कामांची माहिती घेतली. हिंगोली ते पूर्णा दरम्यान रेल्वे गेट क्र. १५५ चे निरीक्षण श्री माल्या यांनी केले. तेथे उपस्थित गेट मेन सोबत कामाविषयी चर्चा केली. तसेच रेल्वे भुयारी पूल क्र. ८५० चे निरीक्षण हि श्री माल्या यांनी आपल्या या दौऱ्यात केले.

येथे क्लिक करा - जिल्हाधिका-यांसह व्यापारीही ठाम; महाबळेश्वरात आज गरमागरमी?

वसमत रेल्वे स्थानकाला भेट दिली. तेथील माल धक्याची पाहणी केली. तसेच रेल्वे स्थानकातील इतर प्रगती विषयक कार्याची माहिती घेतली. या दौऱ्यात शेवटी गजानन माल्या यांनी पूर्णा रेल्वे स्थानकावर विविध सुविधांची पाहणी केली. रेल्वे दवाखान्यास भेट दिली. त्या सुधारण्याच्या सूचना केल्या. पूर्णा रेल्वे स्थानकावरील उपलब्ध प्रवासी सुविधांची माहिती घेतली, तसेच रनिंग रुमची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात अकोला ते पूर्णा दरम्यान येणाऱ्या रेल्वे पटरीचे श्री माल्या यांनी सुरक्षेच्या दृष्टीने निरीक्षण करुन सुचना दिल्या.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com