बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर; शाळकरी मुलांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास

रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त १२ ते १५ विद्यार्थी बसवले जात आहेत. विशेष म्हणजे रिक्षा चालकाच्या दोन्ही बाजूला विद्यार्थ्यांना हात ताटलेल्या अवस्थेत प्रवास करावा लागतोय.
Beed News
Beed Newsविनोद जिरे

बीड : बीडमध्ये शाळकरी मुलांना घेऊन जाणारे रिक्षावाले मुलांच्या सुरक्षीततेची काळजी घेत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांना घरापासून शाळेत जाण्यासाठी स्कुल रिक्षातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचं चित्र बीडमधून (Beed) समोर आलं आहे. कारण विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे हे स्कुल रिक्षावाले एका मुलाच्या मांडीवर एक मुलगा बसवत आहेत.

शिवाय एका रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त १२ ते १५ विद्यार्थी बसवले जात आहेत. तर विशेष म्हणजे रिक्षा (School rickshaw) चालकाच्या दोन्ही बाजूला विद्यार्थ्यांना हात ताटलेल्या अवस्थेत प्रवास करावा लागतोय. या दरम्यान जर दुर्दैवाने एखाद्या विद्यार्थी मुलाचा हात सटकला, तर मोठी दुर्घटना देखील घडू शकते. यामुळं याला वेळीचं आवर घालणं महत्वाचं ठरणार आहे.

पाहा व्हिडीओ -

तर याविषयी बीडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (Sub-Regional Transport Officer) स्वप्निल राठोड म्हणाले, की बीडमध्ये मोठ्या प्रमाणात विनापरवाना, अवैध, फिटनेस नसणारे रिक्षा खुलेआम सुरू आहेत. शाळेच्या विद्यार्थ्याचा धोकादायक प्रवास सुरु आहे. विशेष म्हणजे रिक्षाला स्कूल व्हॅन (School Van) म्हणून चालवायला परवानगी नाही. मात्र तरीही विद्यार्थ्यांची ने-आण केली जातेय.

यामुळे आता अवैधपणे, धोकादायक पद्धतीने, फिटनेस नसणाऱ्या रिक्षांवर कारवाई करणार असून लवकरच ही मोहीम आम्ही हाती घेत आहोत. अशी प्रतिक्रिया बीडचे आरटीओ (RTO) स्वप्निल माने यांनी बोलताना दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com