Saam Impact : स्टंटबाज युवकांना नाेटीसा; बोरी पोलिसांत हजर व्हा

Saam Impact : स्टंटबाज युवकांना नाेटीसा; बोरी पोलिसांत हजर व्हा
floods

परभणी : परभणी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नदी आणि नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. सेलू तालुक्यातील कुपटा या गावात पुराच्या पाण्यात दोन युवकाने उडी घेत स्टंटबाजी केली. अत्यंत धाेकादयक रित्या स्टंट करणा-या दाेघांचे प्राण वाचले. ही घटना सर्वप्रथम साम टीव्हीने जनतेसमाेर आणली. युवकांचे प्राण वाचले असले तरी असे प्रकार पुन्हा हाेऊ नयेत यासाठी प्रशासनास असहाकार्य करणा-यांवर जरब बसली पाहिजे अशी भावना प्रेक्षकांनी देखील घेतली. selu-bori-parbhani-floods-maharashtra-youth-stunt-sml80

या स्टंटबाजांचे चित्रीकरण प्रेक्षकांनी पाहिल्यानंतर त्यांनी देखील अशा कृत्यामुळे प्रशासनावर कामाचा ताण येऊ शकताे अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दरम्यान या घटनेची प्रशासनाने दखल घेत सेलूचे तहसीलदार बालाजी शेवाळे यानी या घटनेतील बाळू शिंदे व बाळू दवडे यांना नाेटीस बजावली आहे.

floods
'तू सदाभाऊंच्यावर टिका करतोस, तुला मस्ती आली आहे'

दाेन्ही स्टंटबाज युवकांवर फौजदारी प्रक्रिया भारतीय संहिता 1973 प्रकरण आठ कलम प्रक्रिया १०७ नमुना क्रमांक १४ शांतता भंगाचे समन्स बजावले आहे. त्यांना पाच हजार रुपयाचे बंधपत्र देत बोरी पोलिस स्टेशनला दोन्ही युवकांना हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com