शिक्षक पतीकडून पत्नीचा सात वेळा गर्भपात !

मुस्लिम समाजातील पीडित महिलांनी समोर यावं - पीडितेने केलं आवाहन
शिक्षक पतीकडून पत्नीचा सात वेळा गर्भपात !
शिक्षक पतीकडून पत्नीचा सात वेळा गर्भपात !विनोद जिरे

बीड : मुलाच्या हव्यासापोटी बुरसटलेल्या मानसितेतील लोक, कधी काय करतील हे सांगता येत नाही. असाच धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय बीडच्या चौसाळा गावामध्ये. या गावात शिक्षक म्हणून मिरवणाऱ्या व्यक्तीने, मुलाच्या हव्यासापोटी, पत्नीचा तब्बल सात वेळा गर्भपात केल्याचे समोर आले आहे. तर या विषयीची माहिती खुद्द पीडित विवाहितेने पोलिसात दिली असून आरोपी पतीवर गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, तिचा विवाह बीडच्या चौसाळा येथील शिक्षक फेरोज शेख यांच्याशी 2008 मध्ये झाला होता. 2011 मध्ये या दाम्पत्याला एक मुलगी देखील झाली. पहिले तीन वर्ष सुखात संसार झाला. मात्र त्यानंतर संसाराला ग्रहण लागलं आणि मुलाच्या हव्यासापोटी पिडीतेचा छळ सुरू झाला. यादरम्यान फेरोज शेख यांचं एका शिक्षक महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचं देखील समोर आलं. याला विरोध दर्शविल्याने पीडितेचा जास्तीचा छळ सुरू झाला. असं असताना 2012 ते 2019 पर्यंत, पती फेरोज याने एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 7 वेळा पीडितेचा मुलाच्या हव्यासापोटी गर्भपात केला. या गर्भपाताला विरोध दर्शविल्याने पती फेरोज कडून मारहाण केली जात असे. गर्भखाली व्हावा, यासाठी बळजबरीने गोळ्या खाऊ घालत असे. असं देखील पीडित विवाहितेने फिर्यादीत म्हटलंय.

हे देखील पहा -

तर याविषयी पीडितेचे वडील म्हणाले, की माझ्या मुलीला चौसाळा येथे दिलेलं आहे. माझ्या मुलीने मला हृदयरोग असल्याने, तिला होणारा त्रास माझ्यापासून लपवून ठेवला. मात्र, ती ज्या वेळेस आजारी पडली, त्यावेळी मला फोन आला, त्यानंतर मी तिला जाऊन आणलं व तिच्यावर उपचार केला. त्यानंतर तिने मला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर मी दोन महिने विचार करत होतो, की समाज आपला नाव ठेवेल. आपण पुढे येऊ नये. "मात्र आता माझं पूर्ण घर जळत आहे, त्यामुळे समाजाचं काय घेऊन बसायचं", म्हणून पुढे येत आहे. आज माझ्या मुलीवर अत्याचार झालाय, त्यामुळे मी पुढे येत आहे. मात्र आज "आमच्या समाजात लाखो महिलांवर अत्याचार होत आहेत". मात्र त्या पुढे येत येऊ शकत नाहीत, त्यामुळं हे अत्याचार कुठपर्यंत सहन करायचा. म्हणून मी माझ्या लेकराला घेऊन पोलिस ठाण्यांमध्ये गेलो. पोलिसांनी देखील आम्हाला खूप मोठी मदत केली आहे. मात्र, माझी एकच मागणी आहे, की माझ्या मुलीला व नातीला न्याय मिळावा, हीच विनंती आहे.

तर या विषयी पीडितेची मुलगी म्हणाली, की "माझे पप्पा माझ्यासमोर माझ्या आईला मारहाण करायचे. मी जेव्हा तिसरीला शिकत होते, तेव्हा मी शाळेतील माझ्या मॅडम जवळ रडत होते. तेव्हा त्या शाळेत शिक्षक असणारे माझे चुलते माझ्या जवळ आले आणि त्यांनी मला स्टाफ रूम मध्ये नेलं. तिथं ते म्हणाले, की जर तू "आम्ही तुझ्या आईला मारहाण करतो" असं कोणाला सांगितलं. तर तुला जिवंत कापून टाकू. त्यानंतर मी पुन्हा माझ्या मॅडम जवळ कधीच रडले नाही. मी खूप भिले होते. अशी हृदयद्रावक प्रसंग सांगतांना 11 वर्षीय चिमुकली क्षणभर स्तब्ध झाली होती.

तर याविषयी पीडित विवाहिता म्हणाली, की या लोकांवर गुन्हा दाखल झाला असून त्यांची जामीन देखील झालीय. मात्र, ज्या महिलेमुळे माझा सोन्याचा संसार उध्वस्त झालाय, जिच्यामुळे माझे पती मला व माझ्या मुलीला बघायला तयार नाहीत. तिच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर माझ्यासारख्या समाजातील अन्यायग्रस्त पीडित मुलींनी समोर यावं व शासनाने त्यांना देखील न्याय द्यावा. अशी देखील मागणी यावेळी पीडितेने केली आहे.

शिक्षक पतीकडून पत्नीचा सात वेळा गर्भपात !
सांगलीत दलित महासंघाचा घोडे घेऊन मोर्चा!

तर, याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे म्हणाले, की, पीडितेच्या लग्नाला 13 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि त्यांच्या पतीचे दुसऱ्या एका शिक्षक महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत. त्याचबरोबर पीडितेला बाजूला करण्यासाठी, शिक्षक पतीकडून नेहमी त्रास दिला जायचा. पाच ते सहा वेळा गर्भपात देखील केला आहे. त्यानुसार भादंवि कलम 498, 313, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती लक्ष्मण केंद्रे यांनी दिली.

दरम्यान, पुरोगामी महाराष्ट्रात राहणाऱ्या या एका समाजातील मुलीने, तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा पाडा सांगत, "आमच्या समाजात अशा लाखो महिला आणि मुली या पीडित असल्याची धक्कादायक माहिती दिली असून समाजाला भिऊन त्या पुढं येत नाहीत. त्यामुळं त्या देखील न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याची खंत व्यक्त केली आहे. दरम्यान ज्यांच्या जीवावर हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य आहे. ज्यांच्यावर देशाचा कणा घडवण्याची जबाबदारी आहे. त्याच शिक्षकांकडून घरातील मुली अन पत्नीवर असा अन्याय अत्याचार होत असेल तर अशा शिक्षकांकडून धडा घेण्याऐवजी त्यांना चांगला धडा शिकवण्याची गरज आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com