अकोल्यात बालगृहातून सात अल्पवयीन मुलींचे पलायन

अकोल्यात बालगृहातून सात अल्पवयीन मुलींचे पलायन
Khadan Police stationsaam tv

अकोला : खदान पोलीस स्टेशनच्या (Khadan police station) हद्दीत असलेल्या बालगृहातील सात अल्पवयीन पळून गेल्याची घटना आज शनिवारी घडली. याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Police Fir field) करण्यात आला आहे. तर पळून गेलेल्यांपैकी दोन मुली या परत आल्या आल्या असून उर्वरित पाच अल्पवयीन मुलींचा (Minor girl absconding) शोध घेतला जात आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Khadan Police station
विराट कोहली आणि रोहित शर्माच्या फॉर्मबाबत 'BCCI' अध्यक्षांचं मोठं विधान

गायत्री बालसुधारगृहात अनेक अल्पवयीन मुली आहेत. अपहरण प्रकरणातील सात अल्पवयीन मुलींना एकाच खोलीत ठेवण्यात आले. दरम्यान, त्यांनी पहाटे रूमची लोखंडी ग्रीलची खिडकी तोडून बाहेर उड्या मारून पळ काढला. पहाटे योगाचा वेळ झाल्याने येथील कर्मचारी त्यांना झोपेतून उठवण्यासाठी आले असता रूमचा दरवाजा आतमधून बंद असल्याने कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर बर्‍याच वेळानंतर खोलीचा दरवाजा तोडल्यानंतर मुली पळून गेल्याचे समजले. दरम्यान, दुपारपर्यंत दोन मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथून दोन मुलींना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, पाच मुलींपैकी तीन मुली या अकोला जिल्ह्यातील असून दोन मुली या बाहेर जिल्ह्यातील असल्याचे समजते.

खडकी येथे असलेल्या बालगृहात अल्पवयीन मुलींची राहण्याची व्यवस्था आहे. या मुली बर्‍याचवेळा या गृहातून पळून गेल्या आहेत. परंतु, त्यामध्ये एक किंवा दोन मुलींचा समावेश असतो. मात्र, आता सात अल्पवयीन मुली पळून गेल्याचे समोर आले आहे. त्यातील दोन मुलींचा शोध लागला असला, तरी इतर पाच अल्पवयीन मुलींचा शोध घेण्याचे आवाहन खदान पोलिसांसमोर आहे. दरम्यान, या मुली पळून गेल्याची तक्रार बालगृहाच्या अधीक्षकांनी खदान पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यांचा शोधासाठी आता पोलिसांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

Edited By- Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.