वाहन काेसळताच गावक-यांनी घेतली धाव; सात जणांचे वाचविले प्राण

वाहन काेसळताच गावक-यांनी घेतली धाव; सात जणांचे वाचविले प्राण
water logged

परभणी : परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यामधील पिंपळगाव नजीक असलेल्या नदीवरील पुलावरून एका चार चाकी मंगळवारी रात्री पडली. दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पूलावर माेठ्या प्रमाणात पाणी साचले water logged हाेते. त्याचा अंदाज चालकास न आल्याने ही घटना घडली. दरम्यान ग्रामस्थांनी वेळीच धाव घेतल्याने वाहनातील सात प्रवाशांचा जीव वाचला.

water logged
सात गावांना काेराेनाचा विळखा; प्रशासनाचा लाॅकाडउनचा निर्णय

पाथरी तालुक्यातील बाबळगाव ते वाघाळा फाटा या रस्त्यावर असलेल्या नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली हाेती. मंगळवारी रात्री पुलावरून पाणी वाहत असताना वाहन चालकाने वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा प्रवाह माेठा हाेता. त्यातच पूलाला कठडे नाहीत. त्यामुळे नेमके पाणी काेठे आहे आणि रस्ता काेठे याचा अंदाज येत नाही.

नेमके तसेच चालकाच्या बाबतीत झाले. त्याने वाहन पुढं नेण्याचा प्रयत्न केला परंतु वाहन पुलावरुन खाली काेसळले. हा प्रकार परिसरातील ग्रामस्थांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या वाहनातील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. रात्रीच्या अंधारत गावकऱ्यांनी माणुसकीतून केलेल्या मदतीचे प्रवाशांनी आभार मानले.

Edited By : Siddharth Latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com