Police : तुम ताे ठहरे परदेसी..., लाॅजवर आले पाेलिस अन् लाेचा झाला ना रे भाऊ

या कारवाईने चुकीचं काम करणा-या व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
nagar aurangabad road, police, raids, lodge
nagar aurangabad road, police, raids, lodgesaam tv

- सचिन बनसाेडे

Nagar : नगर (nagar) जिल्ह्यात पोलिसांनी (police) एकाच वेळी चार लॉजवर छापा टाकला. या लाॅजवर वेश्या व्यवसाय चालत हाेता. त्याचा पर्दाफाश पाेलिसांनी केला आहे. या छाप्यात सात परप्रांतीय युवतींना (youth) ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Nevasa Latest Marathi News)

नेवासा फाटा येथे काही लॉज चालक वेश्या व्यवसाय चालवतात. त्यासाठी परप्रांतीय तरुणींचा वापर केला जात असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय करे यांनी पाच पोलीस ठाण्याची विविध पथकं तयार केली.

या पथकानं बुधवारी सायंकाळी नगर- औरंगाबाद रस्त्यावरील चार लॉजवर एकाच वेळी छापे टाकले. यावेळी तीन लॉजवर सात परप्रांतीय तरुणींच्या माध्यमातून हा वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पाेलिसांचे निदर्शनास आले. पोलिसांनी सर्व तरुणींना ताब्यात घेतलं. तसेच हॉटेल चालकांसह मॅनेजरवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला.

nagar aurangabad road, police, raids, lodge
Sports : तिच्याशी झटायचा, अश्लील व्हिडीओ पाठवायचा; क्रीडा प्रशिक्षकास अटक

याबाबत डीवायएसपी संदीप मिटके म्हणाले नगर - औरंगाबाद रस्त्यावरील काही हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती आम्हांला मिळाली. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत ७ पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे.

दरम्यान या कारवाईने चुकीचं काम करणा-या व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. नेवासा फाटा परिसर गेल्या काही दिवसांपासून अवैध वेश्या व्यवसायाचा अड्डा बनला होता. पोलिसांनी एकाच वेळी चार ठिकाणी छापा टाकून या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

nagar aurangabad road, police, raids, lodge
Navratri : भाविकांनाे ! तुळजाभवानीच्या दर्शनास जाणार आहात ? वाचा महत्वपुर्ण निर्णय
nagar aurangabad road, police, raids, lodge
Gram Panchayat Election Result 2022 : राष्ट्रवादी पुन्हा; जनतेनं त्यांच्या ४० वर्षांच्या वर्चस्वाला दिला धक्का

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com