अकोल्यात समाजकार्याच्या नावाखाली विवाहितेवर बलात्कार; ब्लॅकमेलकरून मारहाण

अकोल्यातील (Akola) खदान परिसरातील एका 39 वर्षीय विवाहितेशी सामाजिक कार्यात ओळखीने घरात घुसून जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
Khadan Police Station Akola
Khadan Police Station Akolaजयेश गावंडे

जयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील (Akola) खदान परिसरातील एका 39 वर्षीय विवाहितेशी सामाजिक कार्यात ओळखीने घरात घुसून जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी खदान पोलिस स्टेशन येथे मारहाण, विनयभंग, ब्लॅकमेलिंग, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सद्या फरार असून खदान पोलीस (Khadan Police Station Akola) आरोपीचा शोध घेत आहेत. (Latest Akola News In Marathi)

Khadan Police Station Akola
रायगड: गरोदर मातांसाठी जिल्हा रुग्णालयातील प्रसूती कक्ष अपुरे; जमिनीवर उपचार घेण्याची वेळ

खदान पोलिस स्टेशनला (39 वर्षीय) विवाहित पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडितेची आरोपी राहुल श्रावण मस्के (रा. न्यू खेतान नगर) याच्याशी सामाजिक कार्यातून ओळख झाली. आरोपीने विविध सामाजिक विषयावर चर्चा करण्यासाठी पीडितेला मार्च 2021 मध्ये घरी बोलावून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला होता. (Akola Crime News In Marathi)

हे देखील पहा-

यादरम्यान, पीडितेला ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार करणे सुरू ठेवले. तसेच नवऱ्याला सर्व सांगतो म्हणून 50 हजार रुपयांची मागणी सुद्धा तिच्याकडे केली. आरोपीचा अत्याचार दिवसेंदिवस वाढत असल्याने याप्रकरणी पीडितेने खदान पोलिस स्टेशन गाठून अखेर तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राहुल श्रावण मस्के विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी खदान पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीरंग सनस यांच्या मार्गदर्शनात पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. (Akola News Marathi)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com