संतापजनक! १३ वर्षीय अल्पवयीन नातीवर आजोबा, काकासह अन्य एकाकडून बलात्कार

Sexual Assault On 13 Years Old Minor Girl In Bhandara : सख्ख्या आजोबानेही नातीवर वाईट दृष्टी ठेवून तिच्याशी वेळोवेळी अश्लील चाळे केले. असाच प्रकार नात्यात काका लागणाऱ्या अनिलनेही केला आहे.
Sexual Assault On 13 Years Old Minor Girl In Bhandara
Sexual Assault On 13 Years Old Minor Girl In BhandaraSaam Tv

भंडारा: सख्खा आजोबाच आपल्या नातीचा वैरी निघाला असून नात्याला काळीमा फासत आजोबाने असहायतेचा फायदा उचलत आपल्या अल्पवयीन नातीवर बलात्कार (Sexual Assault) केल्याची धक्कादायक घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या अल्पवयीन नातीवर (Grand Doughter) आजोबांसह (Grand Father) दोन आरोपींनीही अत्याचार केल्याने सामोर आले असून आता आरोपी आजोबासह अन्य दोन आरोपींवर लाखनी पोलिसांनी अत्याचारासह पोक्सो (protect children from offences of sexual assault, sexual harassment and pornography) कायदानुसार गुन्हा नोंद करत अटक केली असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. विलास देवराम तुमसरे वय ५६ वर्ष, यशवंत तातोबा कमाने वय ६७ वर्ष दोन्ही रा. गडेगाव ता. लाखनी, अनिल रमेश सेलोकर वय २५ वर्ष रा. रोहणा ता. मोहाडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. (sexual assault on 13 years old minor girl from past 3 years by her grandfather, uncle and one another person in bhandara)

हे देखील पाहा -

पीडिता ही १३ वर्षांची असून पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला असून ती आई आणि आजोबासह राहते. तिच्यावर २०१९ पासून हा अत्याचार होत होता. ११ वर्षाची असताना तिला पहिल्यांदा लैंगिक अत्याचारांचा सामना करावा लागला. २०१९ मध्ये पीडिता ही एकटीच शेतात गेली असताना तिथे कोणीच नसल्याची संधी साधून आरोपी विलास तुमसरे याने तिला बळजबरीने शेतातील झोपडीत नेऊन अत्याचार केला. त्यानंतर, घटनेबाबत वाच्यता केल्यास भावाला आणि आईला मारून टाकेल अशी धमकी दिली. पीडितेने घटनेची माहिती कुणालाही दिली नाही. त्यामुळे आरोपीची हिम्मत वाढल्याने त्याने चिमुकलीवर आणखी तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार गेला. दरम्यान सख्ख्या आजोबानेही नातीवर वाईट दृष्टी ठेवून तिच्याशी वेळोवेळी अश्लील चाळे केले. असाच प्रकार नात्यात काका लागणाऱ्या अनिलनेही केला आहे.

Sexual Assault On 13 Years Old Minor Girl In Bhandara
एटीएम कार्ड बदलवून शेतकऱ्याची फसवणूक; ३६ हजारात गंडवले

मागील तीन वर्षांपासून वारंवार होणारा अत्याचार असह्य झाल्याने पीडितेने स्वतः पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केल्यानंतर हा किळसवाणा आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पीडितेच्या तक्रारीवरुन आजोबांसह तिघांविरुद्ध विनयभंग, अत्याचार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली आहे. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मात्र नात्यातील व्यक्तीद्वारे असा किळसवाना प्रकार झाल्याने नात्यावर विश्वास ठेवावा कसा? असा प्रश्न आता समोर आला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com