गोंदिया पुन्हा हादरला; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भपातानंतर मृत्यूशी झुंज

अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या धक्कादायक घटनेमुळं गोंदिया पुन्हा हादरला आहे.
minor girl molested in gondia
minor girl molested in gondiasaam tv

गोंदिया : अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या धक्कादायक घटनेमुळं गोंदिया (Gondia) पुन्हा हादरला आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Minor Girl Molested) केल्यामुळं पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती झाली. हा धक्कादायक प्रकार आरोपीला कळताच त्याने डॉक्टरांच्या परवानगीशिवाय पीडित मुलीला गर्भपाताच्या गोळ्या जबरदस्ती खायला दिल्या. त्यामुळं पीडितेच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून गोंदियातील बाई गंगाबाई रूग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. पीडित मुलगी रुग्णालयात मृत्यूशी झूंज देत आहे. याप्रकरणी पोलिसांनी (culprit arrested) आरोपीला अटक केली आहे.

minor girl molested in gondia
भविष्यात शिवसेनेच्या नादी लागण्याची हिंमत कुणीही करायला नकाे, उद्धव ठाकरे कडाडले

गोंदियात अल्पवयीनवर नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यावर शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरु असून कायंदे यांनी तिच्या प्रकृतीची विचारपूसही केली. गोंदियात महिलांवरील अत्याचाराची प्रकरणं वाढत असल्याने कायंदे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केलीय.

minor girl molested in gondia
Common Wealth Games 2022 : जिद्दीनं खेळत लक्ष्य सेननं मिळविलं गाेल्ड; देशात फटाक्यांची आतषबाजी

मिळालेल्या माहितीनुसार, भंडाऱ्यात महिलेवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच गोंदियात अल्पवयीनवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यामुलं पीडित मुलगी गर्भवती झाली. आरोपीनं डॉक्टरांच्या परवानगीशिवाय पीडित मुलीला गर्भपाताच्या गोळ्या जबरदस्ती खायला दिल्या. त्यानंतर पीडित मुलीची प्रकृती खालावली असून गोंदियातील रुग्णालयात पीडिता मृत्यूशी झूंज देत आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com