शहाजी पाटलांच्या विमान प्रवासावरून सदाभाऊ खोतांची टोलेबाजी, पाटलांनीही दिली खास शैलीत दाद

शहाजी पाटीलांनी देखील दाद देत विमान प्रवासाचा किस्सा आपल्या गावरान शैलीतुन कथन केला यामुळे उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ निर्माण झाला होता.
Sadabhau Khot/ Shahaji Patil
Sadabhau Khot/ Shahaji PatilSaam Tv

सांगली - आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्या सुरत, गुवाहटी आणि गोवा विमान प्रवासावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची मिश्किल टोलेबाजी केली. त्याला शहाजी पाटीलांनी देखील दाद देत विमान प्रवासाचा किस्सा आपल्या गावरान शैलीतुन कथन केला यामुळे उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ निर्माण झाला होता. क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित कार्यक्रमाते सदभाऊ खोत आणि शहाजी पाटील हे दोघेही एकत्र आले होते.

सदाभाऊ खोत यांनी शिवसेनेतुन फुटून बाहेर पडलेल्या आमदारांचा दाखला देत शहाजी बापू सुरत वरून गुवाहटी आणि नंतर पुढे गोव्यात जाऊन पोचले. ते आता महाराष्ट्रातलं सरकार घालवून शहाजी बापू वाळव्याला आले अशी टिप्पणी केली. शहाजी बापूंच्या त्या एका डायलॉग मुळे रांगडी भाषा सातासमुद्रा पार गेली. शहाजी बापू शिवसेनेचे सरकार गेलं नाही, हे सेनेचेच सरकार आहे. स्टेजवरील दोन माणसं निश्चित मंत्री आहे. बापूचं तर ओके आहे सगळे असे म्हणताच सभेत हशा पिकला.

हे देखील पाहा -

सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार चालवत आहेत. चांगले काम सध्या महाराष्ट्र मध्ये सुरु आहे. दोन वाडपे व्यवस्थित वाढत असतील तर 40 जणांची काय गरज आहे असा टोलाही खोत यांनी लगावला. सरकार नसल्यावर लय वाईट परिस्थिती असते. सत्ता असताना माणसाच्या घरासमोर 1 किलोमीटरपर्यंत सकाळी सकाळी रांग असायची. सत्ता गेल्यावर मात्र सगळी गर्दी गायब झाली असेही खोत म्हणाले. आता एसटी कर्मचारी आमच्या सरकारमध्ये सुखी राहणार आहेत. शहाजी बापूंनाच परिवहन खाते देऊन टाकतो. आता तुम्ही म्हणाल हे पद वाटप करत बसलाय काय? असा टोला देखील खोत यांनी यावेळी केला.

Sadabhau Khot/ Shahaji Patil
India Corona Update: धोका कायम! गेल्या 24 तासात 20 हजारांहून अधिक रुग्ण

तर सदाभाऊ खोत यांच्या या टीकेला गावरान शैलीतुन शहाजीबापू पाटील यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, माझ्या हातातला मोबाइल जेवढा चांगला आहे तेवढाच वाईट असे म्हणत या मोबाइलमधील एका वाक्याने मला जगभर पोचण्याचं काम केलं. डोंगर, झाडी पार जगभर गेली. डोंगर-झाडाने जरा चांगले दिवस आलेत. पण अनेक ठिकाणी माझी पंचाईत देखील होत आहे असे शहाजी बापुनी सांगितले. डोंगर, झाडीवाले आले म्हणत लोक गाड्या आडव्या लावतात आणि फोटो काढण्यासाठी एकच गर्दी होते. बाहेर आता पहिल्यासारखे फिरता येत नाही. सुरत, गुहाहटी आणि गोवा मार्गे सरकार स्थापनेपर्येंतचे अनेक किस्से भाषणात शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com