Raksha Bandhan : त्यांच्या आनंददायी जीवणासाठी मी कटीबद्ध; शहाजीबापूंच्या वाड्यात रंगला रक्षाबंधन साेहळा (व्हिडिओ पाहा)

हा भावनिक क्षण अनुभवण्यासाठी पाटील कुटुंब उपस्थित होते.
Raksha Bandhan 2022, shahajibapu patil
Raksha Bandhan 2022, shahajibapu patilsaam tv

shahajibapu patil : रक्षाबंधन म्हटलं बहिण भावाच्या बंधनांचा सण...! बहिणीच्या रक्षणाची शपथ देऊन बहिण राखीचा धागा भावाच्या हातुन बांधते आणि सदैव माझ्या पाठीशी उभं रहाण्याचे वचन भावाकडुन घेते. या सणा निमित्त आज आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाड्यात माेठ्या उत्साहात रक्षाबंधन सण साजरा झाला. सुमारे चारशे महिलांनी शहाजीबापूंना राखी बांधली. बापूंनी त्यांना आशिर्वाद देत गिप्ट दिलं. (Raksha Bandhan 2022 Latest Marathi News)

आज रक्षाबंधन सण (raksha bandhan 2022 festival) देशभर साजरा होत आहे. काय झाडी फेम सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाड्यात राखी बांधण्यासाठी महिलांची एकच गर्दी झाली हाेती. हा भावनिक क्षण अनुभवण्यासाठी पाटील कुटुंब उपस्थित होते.

Raksha Bandhan 2022, shahajibapu patil
Raksha Bandhan 2022 : रक्षणकर्त्यांसमवेत रक्षाबंधन; पाेलिस ठाण्यात उत्साहाचं वातावरण

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या दोन बहिणींनी त्यांना चीक महुद मधील घरी येऊन राखी बांधली. यांनतर चीक महूद मधील महिलांनी आमदार पाटील यांना राखी बांधण्यासाठी गर्दी केली होती. जवळपास चारशे महिलांनी (women) आज चीक महुद मध्ये हा सण साजरा केला. यावेळी मायेची भेट म्हणून बापूंनी ओवाळणी म्हणून या बहिणींना साडी भेट दिली.

Edited By : Siddharth Latkar

shahajibapu patil raksha bandhan in sangola
shahajibapu patil raksha bandhan in sangolasaam tv
Raksha Bandhan 2022, shahajibapu patil
Baburao Pacharne : शिरूर-हवेलीचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचं निधन; पंचक्रोशीवर शोककळा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com