Balasaheb Thackeray Smrutidin : ते काेत्या मनाचे ! शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरे गटावर हल्लाबाेल

बाळासाहेब ठाकरे हे काेणा एका पक्षाचे नेते नव्हते. ते राष्ट्रपुरुष हाेते असेही देसाईंनी नमूद केले.
shambhuraj desai
shambhuraj desaiSaamTv

Balasaheb Thackeray Smrutidin : बाळासाहेब ठाकरे हे काेणा एका पक्षाचे, व्यक्तीचे नेते नव्हते ते देशाचे नेते हाेते. राष्ट्रपुरुष हाेते. त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना वंदन करणे त्यांचा आशीर्वाद घेणे हा आमचा सर्वांचा अधिकार आहे. त्यामुळे काेत्या मनाच्या लाेकांना ते आवडले नसावे असे साता-याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी (shambhuraj desai news) पाटण येथे नमूद केले.

शंभूराज देसाई म्हणाले सन 1997 कालावधीत बाळासाहेब ठाकरे हे स्वत: आमच्या दाैलतनगर मरळी गावी आले हाेते. माझ्या वडिलांच्या जयंती दिवशी (20 नाेव्हेंबर 1997) त्यांनी मला शिवसेनेत प्रवेश दिला. त्या दिवसापासून आम्ही बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांच्या विचाराने पाटण तालुक्यात तसेच सातारा जिल्ह्यात काम करीत आहे.

shambhuraj desai
Mumbai Local Mega Block : रविवारी रेल्वेचा मेगा ब्लाॅक; प्रवाशांसाठी बेस्ट सज्ज, शनिवारपासून जादा बसेस

काही काळ म्हणजेच मागचे अडीच वर्ष आम्ही हिंदुत्वाच्या विचाराने बाजूला पडलाे हाेता. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा हिंदुत्वाचा विचार ज्वलंत केला आहे. बाळासाहेबांचा विचार तळागळात पाेहचवत आहाेत.

shambhuraj desai
Satara News : मनामती चौक गोळीबारप्रकरणी एमएम कंपनी टाेळीस माेक्का; आठ युवकांचा समावेश

दरम्यान शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या गटाने शुद्धीकरण केले. या प्रश्नावर शंभूराज देसाई (shambhuraj desai) म्हणाले जी मंडळी काेत्या मनाची असतात. ती मंडळी असा प्रकार करतात. बाळासाहेब ठाकरे हे काेणा एका पक्षाचे, व्यक्तीचे नेते नव्हते ते देशाचे नेते हाेते. राष्ट्रपुरुष हाेते. त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना वंदन करणे त्यांचा आशीर्वाद घेणे हा आमचा सर्वांचा अधिकार आहे. त्यामुळे काेत्या मनाच्या लाेकांना ते आवडले नसावे असेही देसाईंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

shambhuraj desai
Shambhuraj Desai News : अन् पालकमंत्री शंभूराज देसाई पाेहचले तुरुंगात

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com