Shambhuraj Desai News : अन् पालकमंत्री शंभूराज देसाई पाेहचले तुरुंगात

सातारा पोलीस दलाचे मंत्रालयस्तरावर जे प्रलंबित प्रश्न आहेत तेही तातडीने सोडविले जातील अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
Satara News, Shambhuraj Desai
Satara News, Shambhuraj Desaisaam tv

Shambhuraj Desai News : सातारा जिल्ह्यात होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तसेच जिल्ह्यात मोठ्या यात्राही होणार आहेत. या निवडणूक व यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची आत्तापासूनच तयारी करावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

सातारा पोलीस विभागाचा आढावा पालकमंत्री देसाई यांनी शिवतेज हॉल येथे घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला कोल्हापूर परीक्षेत्राचे प्र. पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.

Satara News, Shambhuraj Desai
Bhima Sahakari Sakhar Karkhana Election Final Result : 'भीमा' त पुन्हा 'मुन्नाराज'; जाणून घ्या सर्व निकाल

महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पथदर्शी प्रकल्प साताऱ्यात राबविण्यात येत आहे, या कार्यक्रमाला गती देण्यात यावी, असे सांगून पालकमंत्री देसाई म्हणाले, जिल्ह्यातील अवैध दारु विक्री बंद झाली पाहिजे यासाठी पोलीस विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे कारवाई करावी. तसेच खासगी सावकारी करणाऱ्यांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करावी.

Satara News, Shambhuraj Desai
Thane News : शिंदे - ठाकरे गट राड्या प्रकरणी 'या' कार्यकर्त्यांसह चाळीस जणांवर गुन्हा दाखल

जिल्हा वार्षिक योजनेमधील चार टक्के निधी हा पोलीस विभागासाठी राखून ठेण्यात येत आहे. या निधीमधून पोलीस विभागाला आणखीन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या निवासस्थानाचे प्रलंबित प्रश्नही सोडविले जातील.

Satara News, Shambhuraj Desai
Crime News : पेठकर कॉलनीतील वृध्दाचा खून; पाेलिस तपासात धक्कादायक माहिती उघड

सातारा पोलीस दलाचे मंत्रालयस्तरावर जे प्रलंबित प्रश्न आहेत तेही तातडीने सोडविले जातील. पालकमंत्री म्हणून पोलीस विभागाला नेहमीच सहकार्य राहील. पोलीस विभागाने सकारात्मक पद्धतीने काम करुन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी नेहमीच प्रयत्नशील रहावे, असेही पालकमंत्री देसाई (shambhuraj desai) यांनी नमूद केले सांगितले. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कारही पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.

Satara News, Shambhuraj Desai
BSF Jawan Sudhir Thorat : मध्य प्रदेशात पुण्यातील जवानाला वीरमरण: आंबेगावात शासकीय इतमामात भावपूर्ण निरोप

सातारा जिल्हा कारागृहात (jail) बंद्यांना जागा अपुरी पडत आहे. सातारा शहरा नजीक नवीन कारागृह बांधण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्हा कारागृह प्रशासनाने सादर करावा असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. पालकमंत्री देसाई यांनी सातारा जिल्हा कारागृहाची पहाणी केली. त्यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे आदी उपस्थित होते.

Satara News, Shambhuraj Desai
NCP : भाेंदूबाबा म्हटल्याने एनसीपी आक्रमक; 'सगळेच जास्त शहाणे झालेत, देवाने सर्वांना राताे रात अक्कल दिली'

तटभिंतीची उंची वाढविणे, कारागृहातील सर्व बॅरेक, स्वयंपाकगृह व कार्यालयावरचे पत्रे बदलणे, संरक्षक भिंतीची दुरुस्ती, अंतर्गत गटर लाईनचे काम, पाकगृहाचे नुतनीकरण यासह अन्य सुविधांसाठी निधी देण्यात येईल अशी ग्वाही देवून कारागृह अंत्यत नेटके व स्वच्छ ठेवल्याबद्दल पालकमंत्री देसाई यांनी समाधान व्यक्त केले.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com