मोठी बातमी! शनिशिंगणापूरमध्ये चौथऱ्यावर आता महिलांनाही शनिदेवाला तैलाभिषेकाची परवानगी

शनिशिंगणापूरचा चौथरा आता सर्वांसाठी खुला
मोठी बातमी! शनिशिंगणापूरमध्ये चौथऱ्यावर आता महिलांनाही शनिदेवाला तैलाभिषेकाची परवानगी
shani ShingnapurSaam Tv

अहमदनगर - शनी शिंगणापूर (Shani Shingnapur)हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी देशभरातून शनिभक्त दर्शनासाठी येत असतात. साडे साती घालवण्यासाठी अनेक भाविक शनीदेवाला तेलाचा अभिषेक घालतात. ही परंपरा असल्याने भाविक मोठ्या श्रद्धेने शनीदेवावर तेल अर्पण करतात. पूर्वी सर्व भाविकांना चौथऱ्यावर जाऊन तैलाभिषेक करता येत होता. मात्र, गेल्या काही वर्षापासून भक्तांना चौथऱ्यावर जावून तेलाचा अभिषेक घालण्यास मनाई केलेली होती.

तसेच शनिशिंगणापूरमध्ये आता चौथऱ्यावर महिलांना देखील तैलाभिषेक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शनिशिंगणापूर येथील चौथरा पुन्हा एकदा सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. विश्वस्तांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

हे देखील पाहा -

भिवकांना चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करता यावा ही भक्तांची सातत्याने होत असलेली मागणी संस्थानने स्वीकारली आहे. मात्र ज्या भाविकांना शनी देवाला तेल अभिषेक करायचा आहे त्यांना देणगी म्हणून ५०० रुपाये मोजावे लागणार आहे. ५०० रुपयांची देणगी पावती घेणाऱ्या सर्व महिला किंवा पुरुषांना चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करता येणार आहे,अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष अध्यक्ष भागवत बानकर यांच्या कडून देण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी शनिवारपासून सुरू झाली.

shani Shingnapur
'अग्निपथ' ला विराेध करण्यास जमलेल्या युवकांना पाेलीसांनी घेतलं ताब्यात

भाविकांना तेल अभिषेक पावतीकरता देवस्थानचे विक्री काऊंटर, देणगी काउंटर तसेच जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे सरचिटणीस अप्पासाहेब शेटे यांनी सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com