नगर शिवसेनेच्या टीमला मिळाली मंत्री गडाखांची साथ

नगर शिवसेनेच्या टीमला मिळाली मंत्री गडाखांची साथ
महापौर रोहिणी शेंडगे यांचा मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विनायक दरंदले, सोनई (अहमदनगर): " कोरोना काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं काम नगर शहरातील माझ्या सर्व शिवसैनिकांनी केले. संभाव्य लाटेतही अशीच भूमिका असूद्या मी सदैव पाठिशी आहेच." अशा शब्दांत कौतुक करीत शाबासकीची थाप जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सोनईतील शिवसंपर्क अभियान बैठकीत दिली.

मुळा शैक्षणिक संस्थेच्या विश्रामगृहात नगर शहरातील शिवसंपर्क अभियानाच्या उदघाटनप्रसंगी मंत्री गडाख बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, महापौर रोहिणी शेंडगे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, शिवसेना नेते संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड, अनिल शिंदे, सर्व नगरसेवक, इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. महापौर निवडीबद्दल शेंडगे यांचा सत्कार करण्यात आला. Shankarrao Gadakh supports Ahmednagar Shiv Sena

महापौर रोहिणी शेंडगे यांचा मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पंकजा मुंडे , विनोद तावडे मोदींच्या भेटीला

कोराना संसर्गाच्या स्थितीत नगर शहरावर मोठे संकट आले होते. मात्र, सर्वच शिवसैनिकांनी जीवाची पर्वा न करता आपुलकीच्या भावनेतून मदतीचा हात दिला. असे सांगून मंत्री गडाख यांनी ही भूमिका शिवसेना पक्षास भूषणावह ठरली. यापुढेही प्रत्येक संकटात पुढे राहत माणुसकीचा धर्म पाळणे. काहीही अडचण असेल तर मी सदैव पाठिशी आहेच, असा विश्वास दिला. मुख्यमंत्री व पक्षाचे ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोचून पक्षवाढीस प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले. Shankarrao Gadakh supports Ahmednagar Shiv Sena

नगर शहराची शिवसेनेबरोबर नाळ जुळलेली आहे. महापौर पदाचे प्रत्येक पाऊल विकास कामासाठीच असणार आहे. टीम शिवसेनेला मिळालेली गडाखांची साथ नक्कीच सार्थकी लावली जाईल.

- रोहिणी शेंडगे, महापौर, अहमदनगर

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com