शरद पवारांनी खासदारांना घेतले साेबत; शशिकांत शिंदेंशी चर्चा

सकाळी काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे कार्यालय फाेडले
शरद पवारांनी खासदारांना घेतले साेबत; शशिकांत शिंदेंशी चर्चा
sharad pawar

सातारा : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) हे सातारा जिल्हा दाै-यावर आले आहेत. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसमधील युवकांसाठी मार्गदर्शन मेळावा आयाेजित करण्यात आला आहे. त्यापार्शभुमीवर शरद पवार यांचा दाैरा असल्याचे राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.

sharad pawar
उदयनराजेंच्या बिनविराेधानंतर सातारा DCC त 'यांनी' मारलं मैदान

दरम्यान आज सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्याने राष्ट्रवादीतील शिंदे समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. त्यातूनच सकाळी काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे कार्यालय फाेडले.

आज सायंकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार हे सातारा शहरातील शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. तेथे त्यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना आपल्यासमवेत घेतले. त्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी कमराबंद चर्चा सुरू केली आहे. हळूहळू एकेक राष्ट्रवादीचे नेते शासकीय विश्रामगृहात येऊ लागले आहेत. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे देखील शासकीय विश्रामगृहात आले. काही वेळानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांची श्री. पवार बैठक घेतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com