
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) विमुक्त जाती, भटक्या जमाती, मागासवर्गीय सेलच्या वतीने कृतज्ञता गौरव सोहळा आयोजीत करण्यात आला होता. त्यात शरद पवार (Sharad Pawar) बोलत होते. देश स्वातंत्र्य झाल्या नंतर ही याचा अर्थ काही जातींना कळला नाही. त्यांच्या हिताची जपवणूक होण्याची गरज आहे. काही जातींचे दुखणे अजून कमी झालेले नाही. लोकशाही मार्गाने काही घटकांना अधिकार वसंतराव नाईक यांनी दिला.
पंचायतराज राज्याची निर्मिती वसंतराव नाईक यांनी केली. आज भटक्या विमुक्त समाजातील तरुण वर्गाचा विकास करायला हवा. संघटन करायला हवे असे मत शरद पवार यांनी या गौरव सोहळ्यादरम्यान व्यक्त केले आहे. 28 मागण्या या समाजाने आज केल्या आहेत. भटक्या विमुक्त मागण्यांबाबत प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष सहभाग असल्याल्यांची बैठक घेऊ असेही शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी यावेळीही राज ठाकरेंवरती नाव न घेता निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणाले की कोणी एका नेत्याने माझ्यावर टीका केली. शरद पवार शाहू महाराज, महात्मा फुले यांचीच नावे घेतात. शाहू महाराज, महात्मा फुले यांनी शिक्षणाची दारे उघडी केली, ज्ञान विज्ञान पुढे आणले. महात्मा फुले यांनी इंग्रजांना दिलेल्या निवेदन पत्राचा शरद पवार यांनी दाखला दिला आहे.
महात्मा फुले दृष्टी असलेले नेते होते. मग त्यांचे नाव नाही घ्यायचे तर कोणाचे घ्यायचे असे म्हणत शरद पवार यांनी राज ठाकरेंवरती टीका केली आहे. सामान्यांना विचार करणारे शाहू महाराज होते म्हणून त्यांचे नाव पाहिले घेतले जाते. या देशात वीज तयार करण्यासाठी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वात मोठे काम आहे. केवळ वीज तयार केली नाही तर जेथे वीज नाही ती पोहचविण्याचे काम हे बाबासाहेबांनी केले असेही शरद पवार म्हणाले.
भारतात अनेक जातीचे लोक आहेत तरीही एकत्र आहोत हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे. याचमुळे आपण शाहू, फुले आंबेडकर यांचे नाव घेतो इतर कोणाचे नाव घेण्याची गरज नाही. मूलभूत महागाईचा प्रश्न बाजूला सारत आज वेगळ्याच मागण्या केल्या जात आहेत. आज चर्चा ही की कोणी सभा घेतो याची आहे. यातून तुमच्या महागाई, बेरोजगारी मधून सुटका होणार आहे का? कोणी हनुमान चालीसा पुढं आणत यातून प्रश्न सुटणार आहेत का? शाहू फुले आंबेडकर विचाराने आपण मार्ग काढू शकतो असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.