Sharad Pawar News: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात; राज्यसभेत आवाज उठवणार

राज्यसरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar saam tv

Maharashtra Farmers: कांद्याचा प्रश्न अतिशय गंभीर असून फक्त नाशिकच नाही तर राज्याच्या इतर भागातही कांद्याचा प्रश्न आणि तक्रारी आहेत. राज्यसरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

कांद्याला निदान १२०० रुपये भाव मिळावा ही मागणी पारनेरच्या शेतकऱ्यांनी आज माझ्याकडे केली असे पवार म्हणाले. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

Sharad Pawar
Ajit Pawar: शेतकरी आत्महत्यांवरुन अजित पवार संतापले! कोणाच्या सरकारमध्ये किती आत्महत्या; आकडेवारीच सांगितली

यावेळी बोलताना शरद पवार यांनी कांद्याच्या निर्यातीबाबत केंद्र आणि अन्य यंत्रणांनी मोठा कार्यक्रम राबवला पाहिजे असे देखील सुचविले आहे. तसेच कांद्याचा प्रश्न राज्यसभेत मांडणार असल्याचे देखील यावेळी पवार यांनी सांगितले आहे.

अनुदानित रासायनिक खत खरेदी करता आता शेतकऱ्यांना आपली जात सांगावी लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यावर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजपर्यंत देशात खत घेण्यासाठी जात विचारण्याचा प्रघात नव्हता, शेतकऱ्यांना जात विचारणे चुकीचे आहे असे पवार म्हणाले. (Latest Maeathi News)

Sharad Pawar
Eknath Khadse: अखेर शिक्कामोर्तब! एकनाथ खडसेंच्या खांद्यावर राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी

दरम्यान यावेळी बोलताना शरद पवार यांनी नागालँडच्या मुद्द्यावरही भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना ते म्हणाले आम्ही भाजपला पाठिंबा दिला अस नाही. नागालँड मध्ये नागांचे काही प्रश्न आहेत. नागालँडचे मुख्यमंत्री भाजपचे नाहीत. त्यांनी आमच्या ७ लोकांना संपर्क केला असे त्यांनी स्पष्ट केले.

रस्त्यात थांबून स्वीकारले शेतकऱ्याचे निवेदन

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शेतकऱ्यांची कैफियत मांडावी यासाठी पारनेर तालुक्यातील रुपेश मारुती ढवण या तरुण शेतकऱ्यांने शरद पवार यांच्याकडे निवेदन दिले. पवार पारनेर दौऱ्यावर असताना त्यांनी रस्त्यामध्येच गाडी थांबवून या शेतकऱ्याचे निवेदन स्वीकारले. (Latest Plotical News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com