शरद पवार यांचे 'मिशन विदर्भ'; उद्यापासून चार दिवस विदर्भात

भाजपच्या गडात राष्ट्रवादीचं मिशन विदर्भ
शरद पवार यांचे 'मिशन विदर्भ'; उद्यापासून चार दिवस विदर्भात
शरद पवार यांचे 'मिशन विदर्भ'; उद्यापासून चार दिवस विदर्भातSaam Tv

नागपूर - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उद्यापासून चार दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या गडात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर आहे. चार दिवसांत शरद पवार नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या भेटी आणि सभा घेणार आहेत.

हे देखील पहा -

नागपूर महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभमिवर उद्या पवार यांची नागपूरातील संघटनात्मक बैठक आणि कार्यकर्ता मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे.नुकतेच काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांना ‘राष्ट्रवादीचं विदर्भातील एकमेव दुकानं बंद करु’ असं म्हटलं होतं, त्या पार्श्वभुमिवर शरद पवार यांचा उद्यापासून होणारा विदर्भ दौरा महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यामुळे राष्ट्रवादीला आणखी बळ मिळेल, असा विश्वास स्थानिक नेते व्यक्त करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com