राजकारणात संधी मिळत नसते, ती हिसकावून घ्यावी लागते : शरद पवार

ज्येष्ठ नेते शरद पवार हे गेले दाेन दिवस सातारा जिल्हा दाै-यावर आले आहेत.
राजकारणात संधी मिळत नसते, ती हिसकावून घ्यावी लागते : शरद पवार
sharad pawar

महाबळेश्वर sharad pawar latest news : राजकारणात संधी मिळत नाही ती हिसकावून घ्यावी लागती. खूर्चीवर लक्ष ठेवून ती मिळवायची असती अन्यथा आम्ही लाेक खूर्चीतून उठत नसताे. त्यासाठी जनमाणसात जाऊन तयारी करा. पक्ष, संघटना बांधणी करताना विकासात्मक दृष्टीकाेन म्हत्वाचा ठरताे. राजकारणात व्यक्तीगत पातळीवर तुमची आेळख निर्माण करा असा माैलिक सल्ला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी युवा वर्गास दिले.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस तर्फे महाबळेश्वर येथे युवकांसाठी शिबिराचे आयाेजन करण्यात आले आहे. या शिबीरातील युवकांनी पवार यांनी मार्गदर्शन केले. युवकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर दिले.

sharad pawar
उदयनराजेंच्या बिनविराेधानंतर सातारा DCC त 'यांनी' मारलं मैदान

शरद पवार म्हणाले मला राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचा चेहरा बदलायचा आहे. युवकांना जास्ती जास्त संधी द्यायची आहे. विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिकांमध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून युवा वर्गास संधी देण्याची तयारी आहे. युवकांना कर्तुत्व दाखविण्याची संधी आहे. आयुष्यात नेतृत्व सिद्ध करण्याची संधी आहे. हे काम करीत असताना युवा वर्गाने पुढाकार घ्यावा. पक्षात युवा वर्गास संधी देत असताना युवतींना देखील संधी द्या असा माझा नेहमी आग्रह असताे. युवती या देखील कर्तुत्वान आहेत. दरम्यान राजकारणात संधी मिळत नाही ती हिसकावून घ्यायची असती. अन्यथा आम्ही लाेक खूर्चीतून उठत नसताे असेही पवार यांनी नमूद केले.

राष्ट्रवादीत युवक जास्त नसतील परंतु लाेकांशी सुखदुखात समरस हाेणारे जास्त आमदार पक्षात असल्याचे पवार यांनी नमूद केले.

या मेळाव्यास गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव समीर सुशीलन, राष्ट्रीय सरचिटणीस अमित जैतपूरवाला, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, रविकांत करपे, सुरज चव्हाण, अरुण आसबे, युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदें, सुभाष शिंदे, बाळासाहेब सोळस्कर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com