हे व्हायला नकाे हाेतं! शरद पवार
sharad pawar- Saam Tv

हे व्हायला नकाे हाेतं! शरद पवार

ज्येष्ठ नेते शरद पवार आज (बुधवार) महाबळेश्वर येथे आले आहेत.

महाबळेश्वर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (dcc bank) निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा ज्ञानदेव रांजणे यांनी एक मताने पराभव केल्यानंतर आमदार शिंदे समर्थकांनी सातारा जिल्हा राष्ट्रवादी भवनावर दगडफेक केली. या भवनाच्या काचा फाेडल्या. आमदार शशिकांत शिंदे यांच्या वर कटकारस्थान केल्याचा आराेप केला. यावर एनसीपीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांनी हे व्हायला नकाे हाेतं असे म्हटलं.

sharad pawar
शशिकांत शिंदेंना हरविणा-या राजणेंसह जावलीकरांना राजे म्हणाले...!

ज्येष्ठ नेते शरद पवार हे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या युवक मेळाव्यासाठी आज महाबळेश्वर येथे आले आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी काल सातारा जिल्हा राष्ट्रवादी भवनावर दगडफेक झाली. या भवनाच्या काचा फाेडल्या गेल्या. यावर तुमचे काय मत आहे या प्रश्नावर पवार यांनी याचे मी समर्थन करीत नाही परंतु हे व्हायला नकाे हाेते असे म्हटलं.

पवार म्हणाले काही तरुण मुलांत समज- गैरसमज हाेतात. राग लाेभ हाेताे. ते क्षणीक असतात, कायमचे नसतात. हे व्हायला नकाे हाेतं. ज्यांच्या पराभवामुळे झाले त्यांनी पक्ष नेतृत्व आणि कार्यकर्त्यांसमाेर दिलगिरी व्यक्त केल्याचे माझ्या पाहण्यात आलं. त्यांनी देखील स्वतः हे व्हायला नकाे हाेत असे म्हटलं आहे. काही वेळेला कार्यकर्त्यांकडून हे घडतं परंतु याचे मी समर्थन करीत नाही असेही पवार यांनी स्पष्ट केले.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com