शरद पवार आमचे आदरणीय, त्यांच्या हातात रिमोट कंट्रोल : नाना पटोले

प्रत्येक पक्षाला ज्याचा त्याचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे.
शरद पवार आमचे आदरणीय, त्यांच्या हातात रिमोट कंट्रोल : नाना पटोले
शरद पवार आमचे आदरणीय, त्यांच्या हातात रिमोट कंट्रोल : नाना पटोलेsaam tv

मुंबई : ''शरद पवार (Sharad Pawar) साहेब राष्ट्रवादीचे (NCP) नेते आहेत. पवार साहेबांच्या मार्गदर्शनात सरकार चालू आहे, त्यांच्या हातात रिमोट कंट्रोल (Remote control) आहे,'' अशा शब्दांत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आज नाना पटोले यांच्या नेतृत्त्वात हँगिंग गार्डन ते राजभवनापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Sharad Pawar has remote control of Mahavikas Aghadi: Nana Patole)

शरद पवार आमचे आदरणीय, त्यांच्या हातात रिमोट कंट्रोल : नाना पटोले
महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणाची काळजी : नाना पटोले

शरद पवार साहेब राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, मी आमच्या पक्षाचा इथला प्रमुख आहे, आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पक्षाला ज्याचा त्याचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत. पवार साहेब राज्याचे नेते आहेत. ते आमचे आदरणीय आहेत. मात्र भाजपा नेते राज्यात अस्थिरता निर्माण करण्यासाठी काहीही म्हणत असतात. त्यांचे नेते त्यांच्याकडे राहावेत, म्हणून ते काहीही बोलत आहेत. भाजपाचे नेते विधानसभेत गोंधळ घालत असतात, राष्ट्रपती राजवट लागू करू अश्या धमक्या देतात. मात्र महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष चालणार. हे त्यांनी लक्षात ठेवावं, अशा स्पष्ट शब्दांत नाना पटोले यांनी विरोधकांना सुनावले आहे.

त्याचबरोबर,यावेळी बोलताना त्यांनी ओबीसी आरक्षणाविषयी आपली भुमिका स्पष्ट केली. बारामती केंद्रस्थानी असल्यामुळे त्यांनी बारामतीत ओबीसी आरक्षणासाठी परिषद घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे यात कोणीही चुकीचा अर्थ घेऊ नये, ही परिषद केंद्रसरकारविरुद्ध असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणाची काळजी आहे. राजकारणापलिकडे जाऊन हे आरक्षण मिळवायचं आहे. त्यासाठी केंद्रसरकारकडून इम्पेरिकल डेटा मिळवण्यासाठी भाजप नेत्यांची मदत होईल. भुजबळ साहेबांच्या वतीने आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी भुजबळांनी फडणवीसांनी भेट घेतली असल्याचे यावेळी नाना पटोले यांनी सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com