Sharad Pawar: जातीयवादाच्या टीकेला शरद पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील सभेमध्ये शरद पवार जातीपातीचं राजकारण करतात असा आरोप केला होता.
Sharad Pawar: जातीयवादाच्या टीकेला शरद पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले...
Sharad PawarSaam TV

सातारा : शरद पवारांवर जातीयवादी म्हणून ज्या टीका झाल्या त्याबाबत त्यांनी आज साताऱ्यात वक्तव्य केलं आहे. 'विनोदी वक्तव्य केले की, मी त्या विनोदाचा आस्वाद घेतो, अशाप्रकारची वक्तव्य केल्यास लोक हसतात, लोक अशा वक्तव्यांना गांभीर्याने घेत नाहीत.' असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर (Raj Thackeray) निशाणा साधला. ते आज साताऱ्यातील भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपस्थित राहिले होते यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले, विनोदी वक्तव्य केले की मी त्या विनोदाचा आस्वाद घेतला. अशाप्रकारची वक्तव्य केल्यास लोक हसतात, लोक अशा वक्तव्यांना गांभीर्याने घेत नाहीत. ओबीसी आरक्षण (OBC Reservation) मार्ग कसा काढायचा यासाठी मुख्यमंत्री आणि मंत्री मंडळ प्रयत्न करत आहेत. भाजपाला सत्ता आपल्या हातात ठेवण्याची अस्वस्थता आहे त्यामुळे सकाळ, दुपार, संध्याकाळी महाविकास आघाडीवर टीका करतात. भोंगा हा काय मुद्दा असू शकत नाही, त्यामुळे ज्यांच्याकडे काही नाही ते असं काही तरी बोलत असतात असही पवार म्हणाले.

हे देखील पाहा -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) सभेमध्ये शरद पवार जातीपातीचं राजकारण करतात, असं म्हटलं होतं. तसंच शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्ष हा त्यांच्या कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही. शिवाय पवारांच्या पक्ष स्थापनेपासून राज्यात जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाली असल्याचंही ते म्हणाले होते. तसंच औरंगाबादमधील सभेतही ठाकरे यांनी या आरोपांचा पुनरुच्चार केला होता. या सर्व पार्श्वभूमिवर पवार यांनी आज राज यांना टोला लगावला.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.