Sharad Pawar In Rayat Shikshan Sanstha : बदलत्या जगाचा रयत शिक्षण संस्थेने वेध घेतला, देशात नावलाैकिक वाढला : शरद पवार

Sharad Pawar Satara Tour: आज शरद पवार हे सातारा जिल्हा दाै-यावर आहेत.
Sharad Pawar, Satara, Rayat Shikshan Sanstha
Sharad Pawar, Satara, Rayat Shikshan Sansthasaam tv

- अक्षय बडवे

Sharad Pawar News : कर्मवीर अण्णांनी (karmaveer bhaurao patil) शेतकरी व कष्टकरी वर्गातील मुलांना शिक्षणाची कवाडं उघडून दिली व कर्तृत्व घडविण्याचा आत्मविश्वास दिला. अण्णांनी लावलेल्या राेपट्याचे आज वटवृक्ष झाले आहे असे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार (sharad pawar in rayat shikshan sanstha) यांनी नमूद केले. मला आनंद आहे की या संस्थेत ४९ टक्के मुली शिक्षण घेतात असेही पवार यांनी नमूद केले.

पवार म्हणाले कर्मवीरांनी तळागळात शिक्षण पोहचविले. रयत शिक्षण संस्था आता वेगळ्या वळणावर आहे. जगातल्या बदलांची नोंद घेऊन त्या प्रमाणे शिक्षण देण्याची आज आवश्‍यकता असल्याचे मत व्यक्त करीत पवार यांनी रयतच्या पुढील वाटचालीबाबत भाष्य केले. (Maharashtra News)

Sharad Pawar, Satara, Rayat Shikshan Sanstha
Shirdi त जाणा-या साईभक्तांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी (पाहा व्हिडिओ)

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज (मंगळवार) रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी विरोधी पक्ष नेते अजित पवार (ajit pawar), खासदार श्रीनिवास पाटील (shriniwas patil), राष्ट्रवादीचे (ncp) नेते दिलीप वळसे पाटील (dilip walse patil), आमदार विश्वजीत कदम, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित हाेते.

Sharad Pawar, Satara, Rayat Shikshan Sanstha
Brij Bhushan Sharan Singh यांना अटक करा; दिल्लीतील आंदोलक कुस्तीगिरांना महाराष्ट्रातून पाठिंबा

प्रारंभी शरद पवार यांनी रामशेठ ठाकूर यांचे विशेष आभार मानले. ठाकूर कुटुंबियांनी रयत शिक्षण संस्थेला ६.५ कोटी रुपयांची देणगी दिल्याबद्दल ठाकूर यांचा तसेच अजित पवार यांनी रयत शिक्षण संस्थेला 50 लाखांची देणगी दिल्याने शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याबराेबरच राज्यातील रयत शिक्षण संस्थेमधील विविध शाळांचा उत्तम कामगिरी केल्याने पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी शरद पवार म्हणाले छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श समोर ठेवत कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्था आणि वसतिगृहांची स्थापना करून तळागळातील मुलांना शिक्षणाची कवाडं खुली करून दिली. स्वतःचे कर्तृत्व घडवण्याचा आत्मविश्वास दिला. आय़ुष्यभर शिक्षण प्रसाराचे व्रत अंगिकारून शिक्षणाची वाट खूली करुन दिली.

Sharad Pawar, Satara, Rayat Shikshan Sanstha
Sangli Court : 'दत्त इंडिया' च्या संचालकांवर FRP प्रकरणावरुन गुन्हा दाखल हाेणार : रघुनाथदादा पाटील

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत अनेकांनी याेगदान दिले. आज त्यांची आठवण येणे स्वाभाविक असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. एका विशिष्ट उंचीवर संस्था पाेहचली असून देशात संस्थेचा नावलाैकिक वाढविण्यसाठी आणखी मेहनत करु असे प्रतिपादन पवार यांनी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com