
नांदेड: अभिनेत्री केतकी चितळेने शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आक्रमक झालेली पाहायला मिळाली. कळवा इथे पहिला गुन्हा केतकी चितळेवरती (Ketaki Chitale) दाखल झाला त्यांनतर पुण्यात गुन्हा दाखल झाला. आता केतकीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या संपुर्ण प्रकरणावर शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पवार म्हणाले ''मला त्या प्रकरणाबद्दल माहीत नाही. मला व्यक्तीही माहित नाही आणि तुम्ही काय सांगताय हे देखील माहित नाही. नक्की काय बोलल्या आहेत हे माहिती झाल्याशिवाय त्यावर भाष्य करणे योग्य नाही.''
शरद पवार आज नांदेडमध्ये होते. यावेळी त्यांनी अन्य विषयावरही भाष्य केले. अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले होते त्यावर शरद पवार म्हणाले औरंगजेबाने इतिहासात महाराष्ट्रात काय केले आहे हे सर्वांना माहित आहे त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेणाऱ्यांचा निषेध करतो. शरद पवार यांचा एक व्हिडिओ भाजपने आपल्या ट्वीटरवर टाकला होता, त्यावरही पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. कवीच्या काव्याचा उल्लेख केला त्याचा वेगळा अर्थ काढला गेला असे पवार म्हणाले. यंदा बीड, जालना, सातारा परिसरात अतिरिक्त ऊस आहे. कारखाना बंद करु नये असं माझं म्हणनं आहे त्या बाबत चर्चा ही सुरु आहे असे पवार म्हणाले.
नांदेडमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत आहे. उद्योजक संजय बियानींच्या हत्येने नांदेड हादरले होते. त्यावर विचारले असता पवार म्हणाले नांदेडमधील गुन्हेगारी बाबत मी लक्ष घालणार आहे. नांदेडमध्ये पोलीस आयुक्तालय सुरू करण्याचा लवकर अंतिम निर्णय घेऊ असे शरद पवार यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे देखील उपस्थीत होते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.