ताणावं पण तुटेल इतकं ताणू नये; ST संपावर शरद पवारांचं सुचक विधान

एसटी बसेस विना ओस पडलेली एसटी बसस्थानकं, काही बस स्थानकांवरून सुरू असलेली खासगी वाहनांची वाहतूक हे चित्र सध्या राज्यभरातल्या शहरांमध्ये पाहायला मिळत आहे.
ताणावं पण तुटेल इतकं ताणू नये; ST संपावर शरद पवारांचं सुचक विधान
ताणावं पण तुटेल इतकं ताणू नये; ST संपावर शरद पवारांचं सुचक विधान SaamTV

नाशिक: एसटी कामगार विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम असल्यानं एसटी संपाबाबत अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही, या पार्श्वभूमीवर ताणावं पण तुटेल इतकं ताणू नये, अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. कामगार आणि राज्यसरकारने यावर एकत्रितपणे तोडगा काढण्याचं आवाहनही शरद पवार यांनी केलं आहे. त्यामुळे आता एसटी संपावर नेमका काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

ताणावं पण तुटेल इतकं ताणू नये; ST संपावर शरद पवारांचं सुचक विधान
एवढा आनंद की ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बुटात बीअर टाकून प्यायले; पाहा Video

एसटी बसेस विना ओस पडलेली एसटी बसस्थानकं, काही बस स्थानकांवरून सुरू असलेली खासगी वाहनांची वाहतूक हे चित्र सध्या राज्यभरातल्या शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्यानं गेल्या 8 पेक्षा अधिक दिवसांपासून लालपरीची चाकं ठप्प झाली आहेत. राज्यसरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या असल्या, तरी विलीनीकरणाबाबत अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपली सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ताणावं पण तुटेल इतकं ताणू नये, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण शक्य नाही, असं प्राथमिक दृष्ट्या तरी दिसतंय, त्यामुळे कामगार संघटना आणि राज्यसरकारने यावर एकत्रितपणे तोडगा काढण्याचं आवाहनही यावेळी पवार यांनी केलं आहे.

कामगारांच्या आंदोलनामुळे एकीकडे एसटीचं होणारं कोट्यवधी रुपयांचं नुकसान तर दुसरीकडे ऐन सणासुदीत प्रवाशांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. राज्यसरकारने कामगारांच्या काही मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतले असले, जोपर्यंत एसटीचं विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका कामगारांनी घेतली आहे. कोर्टातही यासंदर्भात लढाई सुरु आहे. कामगारांनी संप मागे घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. आता या प्रश्नी खुद्द शरद पवार यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सूचक विधान केल्यानंतर तरी एसटी कामगारांच्या संपावर काही तोडगा निघतो का? कामगार आंदोलनाचं हत्यार म्यान करणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com