या गोष्टी राज्यपालांकडून होत असतील तर लोकांनी लोकशाहीवर विश्वास कसा ठेवायचा - शरद पवार

'सत्तेचे काही गुण असतात काही दोष असतात. केंद्रित झालेली सत्ता सामान्य माणसाला त्रास देते.'
Sharad Pawar On
Sharad Pawar On Saam TV

धुळे : विधानसभा अध्यक्षपदासाठी उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पाठवलेल्या पत्रावर राज्यपालांनी २ वर्षे सही केली नाही. मात्र, सरकार बदललं आणि २ दिवसात निवडणूक लावली. राज्यपालांसारख्या व्यक्ती सभागृहात एक वर्षापूर्वी एक भूमिका घेतात आणि एक वर्षांनंतर वेगळी भूमिका घेतात.

जर हे लोकशाहीत राज्यपालांकडून होत असेल तर लोकशाहीवर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावर निशाणा साधला . ते आज धुळे येथील पत्रकार परिषदेत बोलत.

यावेळी बोलताना पवार म्हणाले, 'नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात जास्तीत जास्त गावात, लोकांमध्ये जावून संवाद साधण्याची इच्छा होती. मात्र काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतीच प्रचंड नुकसान झालं आहे. अजित पवार त्या भागाचा दौरा करतायत आणि राज्यसरकारने काय करायला हवं, याच्या सूचना देतायत, याचा आनंद आहे.'

पाहा व्हिडीओ -

ते पुढे म्हणाले, 'सत्तेचे काही गुण असतात काही दोष असतात. केंद्रित झालेली सत्ता सामान्य माणसाला त्रास देते. सगळी सत्ता मुठीत ठेवण्यासाठी, संबंध देशाचे मालक आम्हीच आहोत अस चित्र निर्माण केलं जातंय. काँग्रेस खासदारांनी राष्ट्रपत्नी म्हणून चूक केली, त्यांनी माफी मागण्याची ही तयारी दाखवली. बोलले एक आणि ३मागणी सोनिया गांधींनी माफी मागण्याची मी माफी का मागायची हे सोनिया गांधी विचारायल्या गेल्या तर त्यांच्यावर लोक धावून आले. राष्ट्रवादी खासदारांनी त्यांना तिथून बाहेर काढलं अन्यथा एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली असती

Sharad Pawar On
Balasaheb Thorat : बंधु- भावाचं वातावरण बिघडवण्याचं काम राज्यपालांनी करणं दुर्देवी : बाळासाहेब थाेरात

विधानसभा अध्यक्ष पदासाठी उध्दव ठाकरे यांनी पाठवलेल्या पत्रावर राज्यपालांनी २ वर्षे विधानसभा अध्यक्ष पदाच्या पत्रावर सही केली नाही. सरकार बदललं आणि २ दिवसात निवडणूक लावली राज्यपाल सारख्या व्यक्ती सभागृहात एक वर्षापूर्वी एक भूमिका घेतात आणि एक वर्षांनंतर वेगळी भूमिका घेतात.

हे लोकशाहीत राज्यपालांकडून होत असेल तर लोकशाहीवर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न त्यांनी यावेळी व्यक्त केला. आज शरद पवार यांचा धुळे दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांच्या हस्ते धुळ्यातील राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com