NCP आमदार शशिकांत शिंदे उद्या राजकीय वाटचाल स्पष्ट करणार

सातारा शहरात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्यात बैठक झाली
NCP आमदार शशिकांत शिंदे उद्या राजकीय वाटचाल स्पष्ट करणार
shashikant shinde

सातारा political news : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्याशी चर्चा झाल्यानंतर तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मंगळवारी (ता.२३) राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (shashikant shinde) यांनी माध्यमांना गुरुवारी (ता.२५) आपली राजकीय वाटचाल स्पष्ट करु असे सांगितले. आमदार शिंदे यांच्या वक्तव्यामुळे सातारा जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वर्तुळात शिंदेंचे नेमकी काय भुमिका राहील याबाबत तर्कवितर्कंना उधाण आले आहे. ncp president sharad pawar held meeting with shashikant shinde in satara

shashikant shinde
२ दिवसात जुळणी हाेईल; 'महाविकास'च्या सतेज पाटलांना विश्वास

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले जिल्हा बँकेत झालेल्या पराभवाबाबत आमचे नेते शरद पवार यांनी झालेल्या गोष्टींबद्दल विचारपूस केली. मी येत्या २५ तारखेस माध्यमांशी सविस्तर बोलणार आहे असे म्हणत पवार साहेब माझी नेहमीच समजूत काढतात. निवडणुकीत हार जीत होत असते. मरेपर्यंत मी शरद पवार यांना सोडणार नाही असे ठणकावून शिंदेंनी नमूद केले.

दरम्यान आता मी माेकळा आहे. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस वाढविण्यासाठी प्रयत्नशिल राहणार आहे. सातारा व जावळीत देखील राष्ट्रवादी वाढविणार असून आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लक्ष घालेन असे एका प्रश्नास आमदार शिंदेंनी उत्तर दिले.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com