शिवेंद्रसिंहराजेंवर शशिकांत शिंदे बरसले; कारस्थान करणारे नाचले

राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा नुकताच सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत पराभव झाला.
शिवेंद्रसिंहराजेंवर शशिकांत शिंदे बरसले; कारस्थान करणारे नाचले
shashikant shinde & shivendraraje bhosale

सातारा shashikant shinde latest news : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (dcc bank) निवडणुकीत ज्या दिवशी माझा पराभव झाला. त्याच दिवशी माझ्या विराेधात कट कारस्थान करणारे नाचले हे सर्वांनी पाहिले. मला गुंडगिरी करायची असती तर मी गाेव्यापासून सावंतवाडी ते अगदी जेथे जेथे उमेदवार हाेते तेथून मी उचलले असते. परंतु ते माझ्या रक्तात नाही. अखेर पर्यंत माझ्यासाठी प्रयत्न करणा-यांना यश का केले नाही कारण त्यांनी मनापासून केलेच नाही असा थेट आराेप राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपचे आमदार व सहकार पॅनलचे सहकारी शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्यावर केला.

shashikant shinde & shivendraraje bhosale
राजकारणात संधी मिळत नसते, ती हिसकावून घ्यावी लागते : शरद पवार

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आज (गुरुवार) राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी माध्यमांसमाेर बॅंकेच्या निवडणुकीत काेणी कसे राजकारण केले यावर प्रकाशझाेत टाकला. यावेळी त्यांनी मी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करताे हे चुकीचे आहे का असा प्रश्न सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना केला आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानत. माझ्या विजयासाठी त्यांनी प्रयत्न केले पण माझा गाफीलपणा नडला असे आमदार शिंदे यांनी मान्य केले. पॅनल निवडण्याच्या प्रक्रियेत मी सहभागी होतो. आपले उमेदवार का पडले हे प्रमुखांनी सांगणे गरजेचं होतं परंतु दुर्दैवाने ते आज मला सांगावे लागत आहे असेही शिंदे यांनी म्हटलं.

ज्येष्ठ नेते रामराजे यांच्या बंगल्यावर बैठक झाली. जावलीतून लढण्याचा आमचा निर्णय झाला. मी उमेदवारी दाखल केली. जे मतदार पळवले गेले ते काेणी पळवले हे सर्वांना माहित हाेते. मनात आलं असत तर सर्व मतदार मी उचलले असते. पण तसं वागलाे नाही. त्यानंतर सातत्याने भेट लांबवली गेली मला शंका आली की आपली फसगत झाली. असाे. काही लोक पडद्याच्या मागे होती ती नृत्यात सहभागी झाली, त्यांचा चेहरा उघड झाला अशी टीका आमदारशिवेंद्रसिंहराजेंवर आमदार शिंदेंनी केली.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com