शशिकांत शिंदेंनी नाना पटोले आणि आशिष शेलार यांच्यावर साधला निशाणा

भाजप नेते आशिष शेलार यांनी काल सातारा दौऱ्यावर असताना महाविकास आघाडीवर सडकून टीका केली होती या टीकेला शशिकांत शिंदे यांनी जोरदार प्रति उत्तर दिले आहे.
शशिकांत शिंदेंनी नाना पटोले आणि आशिष शेलार यांच्यावर साधला निशाणा
शशिकांत शिंदेंनी नाना पटोले आणि आशिष शेलार यांच्यावर साधला निशाणा Saam Tv

सातारा: कॉग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) हे सध्या त्यांनी दिलेल्या विविध विधानांच्या मुळे चर्चेत आहेत. त्यांनी सध्या माझ्यावर पाळत ठेवली जात आहे असे विधान केले आहे. या बाबत राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी आज नाना पटोले यांचे चांगलेच कान टोचले आहेत. नाना पटोले हे शत्रूंवर आरोप करायचे सोडून मित्रांवर आरोप करत आहेत आणि पाळत ठेवली जात असेल त्या बाबत त्यांनी त्याच्या नेत्यांशी अंतर्गत चर्चा करायला हवी आशा प्रकारचा सल्ला सुद्धा शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

त्याच प्रमाणे भाजप नेते आशिष शेलार यांनी काल सातारा दौऱ्यावर असताना महाविकास आघाडीवर सडकून टीका केली होती या टीकेला शशिकांत शिंदे यांनी जोरदार प्रति उत्तर दिले आहे.

आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीचे सरकार हे कुबड्या घेऊन चालले असल्याची टीका केली होती. या वर बोलत असताना शशिकांत शिंदे म्हणाले भाजप सुद्धा आत्ता पर्यंत शिवसेने सोबत कुबड्या घेवून राज्यात सरकार चालवत होते. त्यामुळे स्वबळाच्या भाषेबाबत भाजपने बोलू नये आता तीन पक्ष एकत्र आल्याने भाजप ला भविष्य काळातील स्वप्न धूसर दिसू लागल्याने भाजप अशी स्टेटमेंट देत आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com