Maharashtra Political News
Maharashtra Political NewsSaam tv

Maharashtra Political News : वरिष्ठ नेते एकत्र आले, पण...; शेकापच्या जयंत पाटील यांनी व्यक्त केली मनातील सल

'शेकापला महाविकास आघाडीत राहून इतर मित्र पक्षाची मदत मिळत नसल्याची खंत शेकापचे जंयत पाटील यांनी खंत व्यक्त केली.

Jayant Patil News : रायगड जिल्हा म्हणजे शेतकरी कामगार पक्ष हे एकेकाळी समीकरण होते. याच शेकापचे अस्तित्व रायगडमधून संपुष्टात येत आहे. नुकत्याच झालेल्या कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आणि शेकाप नेते बाळाराम पाटील यांचा पराभव झाला. या पराभवानंतर पहिल्यांदाच शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी मनातील खदखद व्यक्त केली.

'शेकापला महाविकास आघाडीत राहून इतर मित्र पक्षाची मदत मिळत नसल्याची खंत शेकापचे जयंत पाटील यांनी खंत व्यक्त केली. (Latest Marathi News)

महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) राहून होणाऱ्या नुकसानीवर भाष्य करताना शेकापचे (Shekap) जयंत पाटील म्हणाले, 'आम्ही विचार करू काँग्रेसला पाठिंबा दिला. पण सर्वात अधिक नुकसान आमचं झालं. वरिष्ठ नेते एकत्र आले पाहिजे. पण त्यांचा आदेश खाली दिला पाहिजे'.

' चुका दुरुस्त केल्या पाहिजे. आमची जागा आली असती. पण आम्ही पडलो. पण आम्ही त्यासाठी राजकारण करत नाही. सगळ्यांनी मदत केले तर आघाडी निवडून येईल, असे पुढे म्हणाले.

Maharashtra Political News
Prakash Surve: 'मला बहिणीसमान असणाऱ्या...'; शीतल म्हात्रेंच्या त्या व्हायरल व्हिडिओवर प्रकाश सूर्वे पहिल्यांदाच बोलले

'मी निवडणुकीत शिक्षक मतदारसंघात काम केले. आमची सीट आली नाही. न आलेल्या सीट आल्या पाहिजे याचा विचार केला पाहिजे. माझा राग नाही. मनात आहे ते बोललो, असेही जयंत पाटील पुढे म्हणाले.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात शेकापचा पराभव कसा झाला?

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे आणि महाविकास आघाडी पुरस्कृत पक्ष उमेदवार आणि शेकापचे नेते बाळाराम पाटील यांच्यात थेट लढत होत झाली. यात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजय मिळविला. बाळाराम पाटील यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. बाळाराम पाटील यांच्या पराभवाने शेकापला मोठा धक्का बसला.

Maharashtra Political News
Political News : भाषण सुरू असतानाच उद्धव ठाकरे मोठा धक्का; मंत्रिपद भूषवलेला नेता शिंदे गटात जाणार

कोकणात पदवीधर मतदारसंघात एकूण ९१.०२ टक्के मतदान झाले होते. यात आता कोकणात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २०, ८०० मतं मिळाली. तर बाळाराम पाटील यांना ९ हजार ५०० मतं मिळाली.या निवडणुकीतील पराभवाने शेकापला मोठा धक्का बसला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com