
- सचिन बनसाेडे
Shevgaon News : छत्रपती संभाजी महाराज जयंती (chhatrapati sambhaji maharaj jayanti) दिवशी नगर जिल्ह्यातील शेवगावात (shevgaon) घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. असाच प्रकार यापुर्वी हनुमान जयंती कालावधीत झाला हाेता. त्यामुळे काही लोक सण समारंभात विघ्न आणण्याचा मुद्दाम प्रयत्न करत आहेत असे वाटते. या घटनेची सखाेल चाैकशी केली जाईल तसेच दाेषींवर कारवाई केली जाईल असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी नमूद केले. (Maharashtra News)
नगर जिल्ह्यातील शेवगाव (shevgaon) शहरात साेमवारी रात्री दोन गटाच्या वादाचे पर्यावसन दगडफेकीत झाली. या प्रकरणी पाेलिसांनी कोंबिंग ऑपरेशन सुरु केले. सध्या शेवगावात तणावपुर्ण शांतता आहे.
दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (radhakrishna vikhe patil) हे श्रीरामपूरहून शेवगावकडे रवाना झाले. त्यापुर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना काेणाची ही गय केली जाणार नाही असे स्पष्ट केले. ते म्हणाले शेवगावचा प्रकार दुर्दैवी आहे. प्रार्थना स्थळात दगड आणि शस्त्र आणून ठेवल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशा घटना घडतील त्या पोलीस निरीक्षकावर कारवाई केली जाईल.
शहरात शस्त्र येतात आणि पोलीस प्रशासनाला माहित होत नाही ? असा सवाल पालकमंत्र्यांनी उपस्थित केला. या घटनेमागे जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्यावर मोक्कासह कडक कारवाई केली जाईल असेही विखे-पाटलांनी स्पष्ट केले.
...तर आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही
विनाकारण महाराष्ट्राचा राजकारण गढूळ करण्याचा प्रयत्न काेणीही करु नये. ज्यांचा पक्ष राहिला नाही, आमदार, खासदार राहिला नाही अशांनी आरोप करू नये असे विखे पाटलांनी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.
ठाकरे गट राज्यातील घटनेवर हिंसाचाराचा आरोप हे केवळ वैफल्यग्रस्त झाल्याने करीत असल्याचे विखे पाटलांनी नमूद केले. आमचं सरकार असल्याने काही मंडळी जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि काही लोक प्रक्षोभक वक्तव्य करून त्याला खतपाणी घालत आहे.
सरकारची भूमिका एकदम स्पष्ट कोणत्याही विशिष्ट जातीला संरक्षण देण्याचा प्रश्न येत नाही. कोणी जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही असा इशारा देखील राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिला.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.