हातात तलवारी घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

Diva Crime News : दहिसर ठाकुरपाडा परिसरात दहशत माजविणाऱ्या ४ जणांच्या मुसक्या शीळ डायघर पोलिसांनी आवळल्या
हातात तलवारी घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या..
thane diva latest crime newsSaam Tv

दिवा : कल्याण (kalyan) ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील आणि १४ गावातील दहिसर ठाकुरपाडा परिसरात दहशत माजविणाऱ्या ४ जणांच्या मुसक्या शीळ डायघर पोलिसांनी आवळल्या आहेत. हातात तलवारी (Sword) व धारदार शस्त्र घेत रस्त्यात दिसेल त्याला मारहाण करीत हे तरुण दहशत माजवीत होते. ही माहिती ग्रामस्थ यांनी दिल्यानंतर  जावेद सलीम शेख उर्फ डीजे (वय ३९), दिलावर उर्फ रुबेल फरीद शेख (वय २७), शाहिद नासीर शेख (वय २२) आणि साद अहमद उर्फ सोनू नासीर शेख (वय २४) अशी अटक केली आहे. तर मारिया जावेद खान याचा पोलीस शोध घेत आहेत. (thane diva latest crime news) 

हे देखील पाहा -

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील आणि १४ गावातील दहिसर ठाकुरपाडा परिसरात सर्व आरोपी राहण्यास आहेत. शुक्रवारी मध्यरात्री 12 ते 3 च्या सुमारास गैरकायद्याची मंडळी जमवून गावात हे आरोपी सार्वजनिक ठिकाणी हातात तलवारी व धारदार हत्यार घेऊन फिरत होते. दिसेल त्याला मारहाण करत, बंद घरांच्या दरवाज्यावर शस्त्रानी बडवावडव करीत, लोकांच्या मालमत्तेचे नुकसान करीत होते. याची माहिती ग्रामस्थांनी शीळ डायघर पोलिसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणी चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

thane diva latest crime news
असा झाला 'त्या' तरुणीच्या खुनाचा उलगडा; सहा दिवसानंतर आरोपी गजाआड

सदर प्रकरणी 5 जणांविरोधात शीळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मारियाचा शोध घेतला जात असल्याची माहिती शीळ डायघर पोलीसांनी यांनी दिली.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.