shahaji bapu patil and ajit pawar
shahaji bapu patil and ajit pawar saam tv

शहाजीबापू पाटील यांनी केली अजित पवारांवर बोचरी टीका; म्हणाले, इंदूरीकर महाराजांचे...'

सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

shahaji bapu patil News : सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. सतत सत्तेवर राहण्याची सवय असल्याने त्यांना आता विरोधी पक्ष नेतेपद जुळत नाही, असे म्हणत अजित पवारांना (Ajit Pawar) आता ओशोच्या भाषणाच्या आणि इंदूरीकर महाराजांच्या किर्तनाच्या कॅसेट ऐकण्याशिवाय दुसरं काम राहिलं नाही, अशी बोचरी टीका शहाजीबापू पाटील (ShahajiBapu Patil) यांनी केली.

shahaji bapu patil and ajit pawar
'निष्ठा विचारांशी, लाचारांशी नाही'; उद्धव ठाकरेंचा 'तो' जुना व्हिडिओ शेअर करत शिंदे गटाने साधला निशाणा

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आमदार शहाजीबापू पाटील यांनी आज पंढरपुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, अजित पवार, निलम गोऱ्हे यांनाही टोले लगावले. दसरा मेळाव्यात पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकणार असे अजित पवार म्हणाले होते. त्यावर आमदार शहाजीबापू पाटील यांना विचारले असता, शहाजी बापू म्हणाले, 'अजित पवार यांना आता दुसरे काम राहिले नाही, त्यांनी दररोज ओशोच्या भाषणाच्या आणि इंदूरीकर महाराजांच्या कीर्तनाच्या कॅसेट ऐकाव्यात असा टोलाही त्यांनी लगावला.

shahaji bapu patil and ajit pawar
टोल लावून लोकांची लूट का केली जात आहे?; नाना पटोलेंचा नितीन गडकरींना सवाल

'अजित पवारांच्या मनातलं अजूनही कोणाला कळालं नाही. अजित पवार आणि माझे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. तरीही शरद पवार साहेबांना त्यांच्या मनात काय चालय हे कळलं नाही, तिथे मला काय कळणार ? अजित पवार कधी झटका देतील काय सांगता येत नाही, असा खोचक टोलाही आमदार पाटील यांनी लगावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com