Nashik News: ठाकरे गटाच्या पोस्टरवर शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे, नाशकात राजकीय चर्चांना उधाण

Nashik
NashikSaam Tv

नाशिक : राजकारणात कधी काय होईल याचा काही नेम नाही. राज्यातील राजकारण तर प्रचंड अस्थिर आहे. त्यामुळे आज एका पक्षात असलेला नेता दुसऱ्या दिवशी वेगळ्या पक्षात दिसला तर कुणालाही नवल वाटणार नाही.

शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटात अशीच काहीशी स्थिती आहे. मात्र नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या विकासकामाचं उद्घाटन शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झालं. (Latest Marathi News)

Nashik
Amruta Fadnavis : मी राज्यपालांना जवळून ओळखते, त्यांना मराठी भाषेविषयी प्रेम; अमृता फडणवीसांची काय म्हणाल्या?

ठाकरे गटाच्या माजी शिवसेना नगरसेविका हर्षदा गायकर यांच्या विकासकामांचे उद्घाटन शिंदे गटाच्या खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते पार पडलं आहे. उद्घाटन सोहळ्याच्या होर्डिंग्जवर ठाकरे गटाच्या मशाल चिन्हासह शिवसेना पदाधिकाऱ्यांचे फोटो देखील आहेत.

Nashik
Maharashtra Politics : भगतसिंह कोश्यारी यांचे राज्यपालपद जाणार? फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, चर्चांना उधाण

या विकासकामांचे उद्घाटन मात्र शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झालं आहे ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेने शिंदे गटाच्या खासदाराला उद्घाटनाला बोलवल्याने शहरात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com