अनोखी परंपरा..एकाच घरातील ५२ चुलीवरचा नैवैद्य लाडक्या बाप्पाला!

अनोखी परंपरा..एकाच घरातील ५२ चुलीवरचा नैवैद्य लाडक्या बाप्पाला!
अनोखी परंपरा..एकाच घरातील ५२ चुलीवरचा नैवैद्य लाडक्या बाप्पाला!
नैवैद्य

सिंधुदुर्ग : नवसाला पावणारा अशी ओळख असलेला सिंधुदुर्गातल्या कुडाळ तालुक्यातील नेरुर माड्याचीवाडी येथील गावडे कुटूबांचा ५२ चुलीचा गणपती संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. (shindhudurg-news-gavade-family-Unique-tradition-ganesh-festival-52-stoves-in-the-same-house)

शाडू मातीच्या २१ गोळ्यांपासुन गणपती घरी मूर्तिकार येऊन बनवतो, ही प्रथा गेले अनेक वर्षांपासून गावडे घराण्यामध्ये चालत आलेले पध्दत आहे. दरवर्षी एकाच पद्धतीचा गणपतीचा पेहराव असतो. फेट्याचा गणपती म्हणून ओळख आहे. त्यात कोणत्याही पध्दतीचा बदल केला जात नाही. कोकणात घरोघरी गणेशोत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा करतात. मात्र गावडे कुटुंबिय एकत्र येत एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करतात. ३०० ते ३५० कुटुंब एकत्र येतात. गावडे कुटुंबिय पाच दिवस एकत्र येत गुण्यागोविंदाने गणेशोत्सव साजरा करतात

५२ चुलीवर शिजते अन्‍न

५२ चुलीवर विविध प्रकारचे पदार्थ बनवून गणपतीला नैवेद्य दाखवला जातो. सर्व महिला एकत्र येत या ५२ चुलीवर जेवण बनवले जाते. रात्री गणपती समोर फुगड्या, भजन करून रात्र जागवली जाते. गेले अनेक वर्षांपासून जी परंपरा चालत आलेली आहे. तीच परंपरा एकत्रितपणे आम्ही चालू ठेवू असे गावडे कुटुंबिय सांगतात.

नैवैद्य
पक्षातील गटबाजीवर अजितदादांचा ‘डोस’

गावडे कुंटुंबियांचा एकत्रितपणा

कोकणात एकत्रितपणा कुटुंब पद्धत फार कमी पाहायला मिळते. मात्र दुर्मिळ होत चाललेली एकत्रित कुटुंब पद्धत अनुभवायची असेल तर कुडाळमधील नेरुर येथील गावडे कुटुंबिय हे एक उदाहरण आहे. गेले कित्येक वर्षे एकत्रित येऊन एकाच ठिकाणी गणेशोत्सव साजरा करतात.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com