Barge Stuck in Uran Sea : वेगवान वाऱ्यांचा जहाजांना फटका; उरणच्या समुद्रात अडकल्या दोन बार्ज

Barge Stuck in Uran Sea : समुद्रकिनाऱ्यापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर हे बार्ज अडकले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
Barge Stuck in Uran Sea
Barge Stuck in Uran Seaसचिन कदम

सचिन कदम

रायगड: उरणच्या (Uran) माणकेश्वर आणि नौदलाच्या परिसरातील समुद्रकिनाऱ्यावरील खडकाळ भागात दोन बार्झ अडकल्या (Barge Stuck in Uran Sea) असून या दोन्ही बार्झवरील खलाशी सुखरूप असल्याचा दावा स्थानिक प्रशासनाने केला आहे. पेण येथील इस्पात कंपनीकडे निघालेले बार्ज वेगावान वाऱ्यामुळे उरणच्या माणकेश्वर आणि नौदलाच्या परिसरातील समुद्रकिनारी असलेल्या खडकामध्ये अडकली आहेत. (Uran Latest News)

हे देखील पाहा -

यातील एका जहाजाचे नाव एम.व्ही. श्रीकांत आहे. मंगळवारच्या संध्याकाळपासून समुद्रकिनाऱ्यापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर हे बार्ज अडकले असल्याची प्राथमिक माहिती आहे. बार्जवर ४ ते ५ खलाशी असल्याचा अंदाज आहे. या दोन्ही जहाजांशी आपला संपर्क झाला असून या जहाजांवरील खलाशी सुखरूप असल्याची माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.

Barge Stuck in Uran Sea
Gondia : देवरी चेक पोस्टवर 47 किलो गांजा जप्त; आरोपीला पोलिसांनी केली अटक

यामध्ये, एक बार्ज हे माणकेश्वर समुद्रकिनाऱ्यापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर दगडांमध्ये अडकले आहे. सुमारे शंभर मीटर लांबीचे एम.व्ही. श्रीकांत हे लोखंडी बार्ज इस्पात कंपनीच्या दिशेने निघाले असताना भरकटले असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवार सकाळच्या सुमारास हेलिकॉप्टरच्या मदतीने या बार्जची तपासणी करण्यात आली आहे. याचबरोबर किनारट्टीवरील नौदलाच्या हद्दीत असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील खडकामध्ये एम.व्ही.जी- २ हे असायोल कंपनीचे दुसरे बार्ज अडकले आहे. दरम्यान, या ठिकाणी नौदलाची हद्द असल्याने या बार्जची चौकशी करण्यात येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com