अभिमानास्पद! शिराळा नगरपंचायतीने फडकवला १०० फूट लांबीचा भव्यदीव्य नेत्रदीपक तिरंगा

संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.
Indian Flag Hoisting at shirala
Indian Flag Hoisting at shiralasaam tv

विजय पाटील

सांगली : संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Independence Amrut Mahotsav) साजरा केला जात असतानाच सांगलीतील शिराळा नगरपंचायतीने एक अप्रतिम उपक्रम राबविला आहे. देशाभक्तीचा नारा अखंड सुरु ठेवण्यासाठी शिराळा नगरपंचायतीने भव्यदीव्य नेत्रदीपक तिरंगा (Indian Flag) आज फडकवला. १०० फूट लांबीचा आणि ६७ फूट रुंदीचा तिरंगा फडकावल्याने शिराळ नगरपंचायतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. शिराळा येथील कार्यक्रमात सर्व शाळा, महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, तसेच पोलीस अधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Indian Flag Hoisting at shirala
CWG22 : हिमा दासचं आव्हान संपुष्टात; प्रियांका गोस्वामीनं चालण्याच्या शर्यतीत पटकाविलं राैप्य

या उपक्रमावेळी शिराळा (Shirala) शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरुन जगजागृती रॅली काढली. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'प्रत्येक घरी तिरंगा' अभियानानं जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानात जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

Indian Flag Hoisting at shirala
Beed News : माझ्याशी बोल नाहीतर संसार मोडेल, धमकी देत ऊसतोड कामगार महिलेवर अत्याचार

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेला १०० फूट लांबीचा आणि ६७ फूट रुंदीचा तिरंगा विद्यार्थ्यांच्या शिरावरून रिमझिम पावसात डौलात आणि अभिमानाने फडकविण्यात आला. या फडकलेल्या राष्ट्रध्वजाला उपस्थित सर्वांनीच राष्ट्रगीताच्या गजरात सलामी देवून मानवंदना दिली.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com