
>>सचिन बनसोडे, साम टीव्ही
Shirdi Night Landing : साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही विमानाने साईदर्शनासाठी शिर्डीला जाण्याचे नियोज करत असाल तर तुमची गैरसोय होऊ शकते. शिर्डी विमानतळावरील नाईट लॅन्डिंगची सुविधा कोलमडली आहे. विशेष म्हणजे मोठ्या प्रतीक्षेनंतर महिनाभरापूर्वीच शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा सुरू झाली होती. परंतु विमानतळ प्राधिकरणाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ही सुविधा एका महिन्यातच ती कोलमडल्याचे समोर आले आहे.
नाईट लँडिंगची चाचणी यशस्वी झाल्यानंतर ८ एप्रिल रोजी दिल्लीहून शिर्डी विमानतळावर रात्रीच्या वेळी पहिले विमान उतरले होते. पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद बघता साईभक्तांसह स्थानिकांनी मोठा आनंद व्यक्त केला होता. मात्र महिनाभरतच या आनंदावर विरजन पडलं आहे. विमानतळ प्राधिकरणाकडे पुरेशा मनुष्यबळाची कमतरता त्याला कारणीभूत ठरली आहे.
याबाबत बोलताना हमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, राज्य सरकारने भरती प्रक्रिया राबवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र DGCA मान्य करत नसल्याचे ते म्हणाले. तसेच लवकर भरती प्रक्रिया पूर्ण झाली तर तांत्रिक अडचणी दूर होऊन नाईट लँडिंग पुन्हा सुरू होईल असे विखे पाटील म्हणाले आहेत. (Breaking News)
शिर्डीतील प्रसिद्ध साई बाबा मंदिराला भेट देण्यासाठी देशभरातून दररोज हजारो साईभक्त शिर्डीत येतात. त्यांना अधिक सुविधा व्हावी यासाठी येथे विमानतळ उभारण्यात आले आहे. यामुळे साईभक्तांकडून आनंद व्यक्त केला जातो. परंतु आता नाईट लँडिंगची सुविधा कोलमडल्याने ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी अशी मागणी साईभक्त करत आहेत. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.