Shirdi: साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाचा आज पहिला दिवस

मंदिर व मंदिर परिसरामध्ये फुलांची आकर्षक सजावट
Shirdi: साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाचा आज पहिला दिवस
Shirdi: साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाचा आज पहिला दिवसगोविंद साळुंके

शिर्डी - तीन दिवस चालणाऱ्या साईबाबांच्या Saibaba पुण्यतिथी उत्सवाचा आज पहिला दिवस आहे. सलग दुसऱ्या वर्षी साईबाबांची पुण्यतिथी कोरोनाच्या महामारीमुळे साध्या पद्धतीने साजरी होत आहे. यंदा साईबाबांचा १०३ वा पुण्‍यतिथी उत्सव प्रतिकात्‍मक स्‍वरुपात साजरा करण्‍यात येत आहे. उत्सवानिमित्त मंदिर व मंदिर परिसरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

गेल्या वर्षी कोरोना व्‍हायरसच्‍या पार्श्वभूमीवर पुण्यतिथी उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. तसेच याही वर्षीचा उत्‍सवही साध्‍या पध्‍दतीने साजरा होत आहे. आज उत्सवाचा पहिल्या दिवस असून साई संस्थानच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते साईसचरित्राच्या पहिल्या अध्यायाचे वाचण करून उत्सवाची सुरवात करण्यात आली.

Shirdi: साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाचा आज पहिला दिवस
मशरूम पावडर कुपोषित बालकांसाठी फायदेशीर

उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असून रुढी परंपरेनुसार आयोजित करण्‍यात येणाऱ्या प्रतिकात्‍मक भिक्षा झोळीकरीता गांवकरी/साईभक्‍तांकडून भिक्षा स्विकारण्‍याकामी मंदिर परीसरात व्‍यवस्‍था करण्‍यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी दिली.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.