
सचिन बनसोडे
शिर्डी (Shirdi News) :
साईबाबांची शिर्डी नगरी आता उद्योगनगरी म्हणून उदयास येणार आहे. राज्य सरकारने (Shirdi) शिर्डीजवळ औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याची घोषणा केल्याने आगामी काळात शिर्डीचा (MIDC) कायापालट होणार आहे. यामुळे शिर्डीत नवीन उद्योग येण्यास सुरवात होणार आहे. (Breaking Marathi News)
साईबाबांची शिर्डी म्हणून ओळख असलेल्या सैनागरीत आता उद्योग उभारणीस आता सुरवात होणार आहे. राज्य सरकारने नुकताच शिर्डी येथे एमआयडीसी उभारणीला मंजुरी दिली आहे. एमआयडीसी सुरू होणार असल्याने शिर्डीत अनेक उद्योग धंदे सुरू होण्याची आशा आहे. याकरिता शिर्डी जवळील शेती महामंडळाच्या पाचशे एकर क्षेत्रावर एमआयडीसी विकसित केली जाणार आहे.
शिर्डीत साईनगरी असल्याने या परिसरात लहान मोठा व्यवसाय करून उपजीविका भागविली जात होती. परंतु आता एमआयडीसी होत असल्याने याच्या माध्यमातून परीसरातील बेरोजगार तरूणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. साधारण दहा हजार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.