Shirdi News : शिर्डीत साईदरबारी सुरक्षारक्षक -साई भक्तांमध्ये हाणामारी, VIDEO व्हायरल

Shirdi News : भक्ताच्या तक्रारीवरून सुरक्षारक्षकांविरोधात अदखलपात्र गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
Shirdi News : शिर्डीत साईदरबारी सुरक्षारक्षक -साई भक्तांमध्ये हाणामारी, VIDEO व्हायरल

सचिन बनसोडे

Shirdi News : साई मंदिराचे सुरक्षारक्षक आणि साई भक्तांमध्ये तुंबळ हाणामारीची घटना आज दुपारी घडली. भक्ताच्या तक्रारीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात सुरक्षारक्षकांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

तर साईसंस्थानच्या सुरक्षारक्षकांना भक्तांना मारहाण न करण्याची तंबी पोलिसांनी दिली आहे. मात्र साई मंदिराच्या प्रवेशद्वारावर अशा पद्धतीची घटना घडल्याने साईबाबांच्या शिकवणीचा विसर पडलाय का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Shirdi News : शिर्डीत साईदरबारी सुरक्षारक्षक -साई भक्तांमध्ये हाणामारी, VIDEO व्हायरल
Shirdi Sai Mandir: शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जायचा प्लान करताय? मंदिरातील दिवसभरातील पूजा कार्यक्रम आणि वेळ जाणून घ्या

मुंबईहून शिर्डीत रामनवमीच्या निमित्ताने पायी पालखी घेऊन येणारे साईभक्त आणि सुरक्षारक्षकांमध्ये आज मारहाणीची घटना घडली आहे. मंदिर परिसरातून बाहेर पडलेल्या एका भक्ताला आपली पिशवी आत राहिल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने पुन्हा पाच नंबर गेटमधून आत जाण्याचा प्रयत्न केला. (Latest Marathi News)

मात्र सुरक्षारक्षकांनी मज्जाव केल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वाद झाला आणि त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. पाच नंबर गेट समोरच सुरक्षारक्षक आणि साईभक्तांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. या प्रकरणी भक्ताच्या तक्रारीवरून सुरक्षारक्षकांविरोधात अदखलपात्र गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.

Shirdi News : शिर्डीत साईदरबारी सुरक्षारक्षक -साई भक्तांमध्ये हाणामारी, VIDEO व्हायरल
Farmer Talks to PM Modi Video: PM मोदींच्या फोटोला Kiss केलं; फोटोसोबत 'मन की बात' करता-करता भावुक झाला

शिर्डीत अनेकदा साईभक्त आणि काही सुरक्षारक्षक यांच्यात क्षुल्लक कारणाने वादाच्या घटना घडत असतात. यापूर्वीही हाणामारीच्या काही घटना घडलेल्या आहेत. मात्र अशा प्रकारांमुळे साई मंदिराचे पावित्र्य भंग होत असल्याने सुरक्षारक्षक असो किंवा साईभक्त दोघांनीही साईबाबांच्या 'श्रद्धा-सबुरी' या शिकवणुकीचा विसर पडू देऊ नये एवढीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com