Shirdi Sai Mandir: शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जायचा प्लान करताय? मंदिरातील दिवसभरातील पूजा कार्यक्रम आणि वेळ जाणून घ्या

Daily Worship Programe at Sai Temple : शिर्डी साई मंदिरातील दिनक्रम कसा असतो, हे माहित असेल तर नक्कीच भक्तांना फायदा होईल.
Sai baba
Sai baba Saam TV

Shirdi Sai Mandir : शिर्डी महाराष्ट्रातीलच नाही देशातील एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे. दरवर्षी लाखो साईभक्त दर्शनासाठी शिर्डीत येतात. मात्र पहिल्यांदाच जाणाऱ्या भाविकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न येत असतात. शिर्डीला कसं जायतं, तिथे राहण्याची सोय काय, वाहतुकीची साधने काय? असे अनेक प्रश्न लोकांना पडतात.

मात्र शिर्डीबाबत बरीच माहिती ऑनलाईन तुम्ही चेक करुन शकता. साईबाबांच्या दर्शनाला जाताना आपलं दर्शन चांगलं व्हावं ही इच्छा प्रत्येक भक्ताची असते. त्यासाठी शिर्डीत तुम्ही कधी पोहोचता हे देखील महत्त्वाचं आहे. अनेकांना काकड आरतीला उपस्थित राहायचं असतं, म्हणून ते रात्रीच शिर्डीत पोहोचतात आणि पहाटे काकड आरतीला हजर राहतात. (Latest Marathi News)

Sai baba
Electric Bus: तिरूपतीच्या देवाला चक्क इलेक्ट्रिक बसेस भेट! मंदिर परिसरात भाविकांसाठी पर्यावरण पुरक वाहतुकीची सोय

मात्र शिर्डी साई मंदिरातील दिनक्रम कसा असतो, हे माहित असेल तर नक्कीच भक्तांना फायदा होईल. साई मंदिर कधी उघडलं जातं. भुपाळी, काकड आरती, मंगल स्नान, धुप आरती, शेज आरती असा दिनक्रम मंदिरात असतो. या सर्वांच्या वेळा तुम्हाला माहित असतील तर तुम्हाला नियोजन करणं सोपं होईल.

Sai baba
Highway Toll Price Hike: मुंबई-पुणे, मुंबई-आग्रा महामार्गावरील प्रवास महागणार; टोलच्या दरात मोठी वाढ, वाचा नवे दर

साई मंदिरातील दिवसभरातील पूजा कार्यक्रम

>> पहाटे 4.45 वाजता मंदिर खुलं होतं.

>> पहाटे 5 वाजता भुपाळी.

>> पहाटे 5.15 वाजता काकड आरती.

>> पहाटे 5.50 वाजता समाधी मंदिरात मंगल स्नान.

>> सकाळी 6.20 वाजता आरती (शिर्डी माझे पंढरपूर)

>> सकाळी 6.25 समाधी मंदिरात दर्शन सुरु.

>> सकाळी 11.30 वाजता, द्वारकामाईत तांदूळ तुपाची धुनी पूजा

>> दुपारी 12 वाजता, मध्य आरती

>> दुपारी 4 वाजता, पोथी वाचन

>> सुर्यास्तावेळी धूप आरती

>> रात्री 8.30 ते 10 वाजता, सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक गाणी

>> रात्री 10 वाजता शेज आरती

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com