भाविकांनाे! ३१ डिसेंबरला शिर्डीत जाणार आहात? नवी नियमावली पहा

राज्य शासनाच्या निर्देशानुसार भाविकांनी काेविड १९ च्या मार्गदर्शकतत्वांचे पालन करावे.
shirdi sai baba
shirdi sai babaगोविंद साळुंके

शिर्डी : साईबाबांच्या शिर्डीत (shirdi) यंदा वर्षाअखेर (३१ डिसेंबर) शिर्डी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. नाताळ (christmas) सुट्टी चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करताना साईबाबांचे दर्शन करण्यासाठी देश-विदेशातून साईभक्त (sai baba devotees) शिर्डीत मोठ्या संख्येने दाखल होतात.

कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर साईबाबांच्या दर्शनाकरता येताना भाविकांनी आपली गैरसोय होऊ नये म्हणून ऑनलाईन दर्शन पास घेऊनच शिर्डीत यावं. दर वर्षी प्रमाणे नियमित यावर्षीही पालखी घेऊन येणाऱ्या पदयात्रींनी शिर्डी येथे पालखी आणू नये असे आवाहन साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत (bhagyashree banayat) यांनी केलं आहे.

बानायत म्हणाल्या कोरोना (covid19) विषाणूच्या पार्श्वभूमीवर साई मंदिरात (sai baba) दर्शनाकरिता ठराविक संख्येने मंदिरात प्रवेश दिला जातो. दर्शन पास वितरण काउंटरवर होणाऱ्या गर्दीमुळे आपली होणारी गैरसोय टाळण्याकरता ऑनलाइन पास बुकिंग करून साई भक्तांनी शिर्डी येथे दर्शना करता यावे, अन्यथा आपली गैरसोय होऊ शकते.

shirdi sai baba
वाद पेटला; रामदास हा शिवरायांचा शिक्षक नव्हता, काेकाटे आक्रमक

राज्य शासनाच्या निर्देशानुसार भाविकांनी मास्क (mask) लावणे वारंवार हात सॅनिटायझ करणे, सामाजिक अंतराचे पालन (social distancing) करणे, दर्शनास प्रवेश करताना दर्शन रांगेतील इतर वस्तूंना आणि साई समाधीला स्पर्श करू नये, साई मंदिरात फुल्हार प्रसाद व इतर पूजेचे साहित्य नेण्यास सक्त मनाई केल्याचे बानायत यांनी नमूद केले आहे.

याबरोबरच जे साईभक्त आजारी आहेत अशा साई भक्तांनी (shirdi sai baba) दर्शना करता येऊ नये. पदयात्री साईभक्तांनी पालखी मंडळांनी पालखी शिर्डीत आणू नये. तरी सर्व साई भक्तांनी व ग्रामस्थांनी याबाबत संस्थांना सहकार्य करावे असे आवाहन साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केल आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com