Shirdi Temple: कोरोनाच्या निर्बंधांमुळे साई संस्थानच्या दानपेटीवर परिणाम

कोरोना निर्बंधांमुळे नेहमी गजबजलेली साईबाबांची शिर्डी ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Shirdi Temple
Shirdi TempleSaam Tv

अहमदनगर : कोरोना निर्बंधांमुळे नेहमी गजबजलेली साईबाबांची शिर्डी ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. देश-विदेशातील साईभक्त साईबाबांच्या दर्शनाला रोज हजारोंच्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल होत असतात (Shirdi Temple Corona Restrictions Impact On The Economy Of Shirdi).

Shirdi Temple
Corona In India: देशात मे सारखा कोरोना विस्फोट? 10 दिवसांत रुग्णांच्या संख्येत 6 पटीने वाढ!

मात्र, कोरोना (Corona) निर्बंधांमुळे रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत साईबाबांचं समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं आहे. शिर्डीत (Shirdi) येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाली आहे.

त्याचा परिणाम शिर्डीच्या अर्थकारणावर झाला आहे. शिर्डीत येणारे भाविक साईबाबांना भरभरुन दान देत असतात. मात्र, गर्दी कमी झाल्याने साईबाबा संस्थानच्या दानपेटीवरही परिणाम झाला आहे.

Shirdi Temple
Shirdi: शिर्डी साई संस्थानकडून दर्शनासाठी नवीन नियमावली जाहीर

शिर्डीतील सर्व अर्थकारण साईबाबांच्या मंदिरावर अवलंबून आहे. शिर्डीमध्ये कोणतीही बाजारपेठ नाही. शिर्डीत शेकडो हॉटेल, रेस्टॉरंट आहे. त्यामध्ये हजारो तरुण काम करत असतात. तसेच, साईबाबांच्या मंदिर परिसरामध्ये फुल, हार, लॉकेट, प्रसादाचे दुकान रस्त्यावर फेरीवाले या सर्व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा उदाहरण आणि हा सर्व साईबाबांच्या मंदिरावर अवलंबून आहे.

शेकडो हॉटेलमध्ये काम करणाऱ्या हजारो तरुणांची उपजीविका शिर्डीत येणाऱ्या भाविकांवर अवलंबून असते. मात्र, सध्या परिस्थिती बदलून गेली आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे देश-विदेशातील येणाऱ्या साईभक्तांची गर्दी कमी झाली आहे. साईंच्या शिर्डीत भाविकच नाही, तर ग्राहक नाही, अशी परिस्थिती शिर्डीत निर्माण होत असते. कोरोनाच्या निर्बंधाचा परिणाम शिर्डीच्या अर्थकारणावर झाला आहे.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com