
बुलढाणा : शिवजयंतीनिमित्त (Shiv Jayanti) चिखली शहरातून काल महिलांची भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. परंतु या रॅलीच्या माध्यमातून साथरोग नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) सह सुमारे पस्तीस जणांवर चिखली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. भाजपा आमदार श्वेताताई महाले यांच्यासह अनेक महिला लोकप्रतिनिधी, विविध पक्षांच्या व सामाजिक संघटनांच्या महिला पदाधिकारी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
हे देखील पहा :
मात्र, कोरोना प्रोटोकॉलचा आधार घेत चिखली (Chikhali) पोलिसांनी या रॅलीला परवानगी नसल्याचे कारण सांगून रॅलीत (Rally) सहभागी झालेल्या महिलांवर गुन्हे दाखल केले आहेत. विनापरवाना मोटारसायकल व स्कुटी रॅली काढून जिल्हाधिकारी बुलढाणा (Buldhana) यांचे जमावबंदी आदेशाचे व महाराष्ट्र शासनाचे कोव्हीड नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप संबंधीतांवर पोलिसांनी लावला आहे.
३० ते ३५ स्कुटी चालक महिलांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्वांवर कलम १८८, २६९, २७० आयपीसी यासह कलम ३ साथरोग प्रतिबंधक अधिनियम, १३५ अंतर्गत ही कारवाई चिखली पोलिसांनी केली आहे. या पोलीस (Police) कारवाईचा शहरात निषेध व्यक्त करण्यात येत असून महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी या कारवाईच्या विरोधात चिखली शहरातील मुख्य शिवाजी चौकात पोलिसांविरोधात ठिय्या आंदोलन केलं.
Edited By : Krushnarav Sathe
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.