Uddhav Thackeray : दुरी तिरी एक्का.. नीम का पत्ता कडवा है... राज्यात ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक (पाहा व्हिडिओ)

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातून गेल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.
Uddhav Thackeray, kolhapur, shirdi, amravati
Uddhav Thackeray, kolhapur, shirdi, amravatisaam tv

- विजय पाटील, संजय बनसाेडे, अमर घटारे

Uddhav Thackeray : शिवसेना जिंदाबाद, उद्धव साहेब आगे बढाे... हम तुम्हारे साथ है अशा घाेषणा देत राज्यात ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. साहेब आदेश द्या साहेब आदेश द्या अशी मागणी करीत कार्यकर्ते विराेधकांना उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे करीत आहे. काेल्हापूर (kolhapur), शिर्डी (shirdi), अमरावती (amravati), परभणी (parbhani) आदी जिल्ह्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निवडणुक आयाेगाचा निषेध नाेंदविला. (Maharashtra News)

Uddhav Thackeray, kolhapur, shirdi, amravati
Supriya Sule : हे अतिशय संतापजनक आहे ! एसटी कर्मचारी आत्महत्येस सुप्रिया सुळेंनी सरकारला धरलं जबाबदार

कोल्हापूरातील बिंदू चाैकात आंदाेलन

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरमध्ये बिंदू चौकात शिवसैनिक रस्त्यावर उतरले. यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. यावेळी महिला आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या देशांमध्ये आणीबाणी जाहीर केलेली आहे. या देशामध्ये सर्व यंत्रणा त्यांच्या बाजूने काम करतात असा दावा शिवसैनिकांनी केला.

देशांमध्ये स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या कामांमध्ये कधी अशा प्रकारच्या घटना घडल्या नाहीत त्या आज घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 बगलबच्चे यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला समोर यावं. त्यावेळेला त्यांना बाळासाहेब ठाकरे म्हणजे काय आहे हे आम्ही दाखवून देऊ असेही शिवसैनिकांनी नमूद केले. आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंना समर्थन करतो आणि एकदा वाघ आमचा बाहेर पडला की या महाराष्ट्रामध्ये हे चिरडून जाणार आहेत असेही शिवसैनिकांनी नमूद केले.

Uddhav Thackeray, kolhapur, shirdi, amravati
Shiv Jayanti : शिवप्रेमींनाे ! शिवजयंतीला किल्ले शिवनेरीला जाणार आहात ? मग हे वाचाच

साई मंदिरात शिवसैनिकांची शपथ

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह उद्धव शिंदे गटाला मिळाल्याने ठाकरे समर्थकांमध्ये शिर्डीत रोष निर्माण झाला आहे. शिर्डीत साई मंदिरासमोर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेत उध्दव ठाकरेंच्या पाठीशी उभं राहण्याचा शिवसैनिकांनी निर्धार केला.

ठाकरे आणि शिवसेना वेगळ्या होऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने काहीही निर्णय दिला असला तरी आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच राहाणार आहाेत. आगामी निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवणार अशा भावना यावेळी ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी व्यक्त केल्या.

Uddhav Thackeray, kolhapur, shirdi, amravati
Aditya Thackeray जरा सुधर ! आज दगडी खाताेयस, उद्या चप्पला खाशील; पाहा Nilesh Rane काय म्हणाले

परभणीत ठाकरे गट उतरला रस्त्यावर

एकीकडे गेल्या काही महिन्यांपासून पक्षाचे नाव आणि चिन्ह बाबत सुरू असलेली लढाई शिंदे गटाने जिंकल्याने शिंदे गटाकडून फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत एकच जल्लोष केला जात आहे. दुसरीकडे परभणीत ठाकरे गटाकडन निवडणूक आयोगाने सेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्याने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या धिक्कार केला. यावेळी कार्यकर्त्यानी शिंदे आणि निवडणूक आयोगा विरोधात घोषणाबाजी करून आपली नाराजी जाहीर केली.

नांदगावात ठाकरे गटाकडून निषेध

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे शेकडो शिवसैनिकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचा नारेबाजी करून निषेध केला. शिवसेना ठाकरे यांच्या गटाचे नाव व चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण व शिवसेनेचे नावं दिल्याने राज्यात खळबळ माजली.

उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोग भाजप सरकार मोदी शहा यांचा निषेध करत बस स्थानक परिसरात मोर्चाचे स्वरूप निर्माण झाले होते. एकनाथ शिंदे मुर्दाबाद भाजपा हटाव लोकशाही बचाव अशी नारेबाजी कार्यकर्त्यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com